नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निफाड सहकारी साखर कारखाना (निसाका) च्या सद्यःस्थितीचा मुद्दा चांगलाच गाजला. निसाकाच्या भवितव्याबाबत जिल्हा बँकेची भूमिका काय, सभासद व शेतकर्यांच्या प्रश्नांवर बँक प्रशासनाने कोणती पावले उचलली, याबाबत जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांना जाब विचारत सभासदांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी संतप्त सभासदांनी मंत्री नरहरी झिरवाळ तसेच बँकेचे प्रशासक बिडवई यांना जाब विचारत गोंधळ घातला. बिडवई यांना धक्काबुक्कीही झाली. अखेर बंदोबस्तातच बिडवई यांना सभेच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले.
जिल्हा बँकेची वार्षिक सभा काल कालिदास कलामंदिर येथे संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेत सर्व विषयांना मंजुरी मिळत असताना निसाकाच्या प्रश्नावरून गोंधळाला सुरुवात झाली. संपूर्ण कर्जमाफी मिळावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, आदी मागण्यात केल्या. माजी आमदार शिरीप कोतवाल यांनी जिल्हा बँकेच्या चुकीच्या चौकशीत आमचा काहीच दोष नसल्याचा दावा केला. यावर शेतकरी संतप्त झाले. त्यांनी नोटबंदीच्या काळात शिल्लक रक्कम दाखविल्याने नफा फुगवला असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला.
दरम्यान, ऐनवेळी येणार्या विषयांवर बोलू न देता सभा अर्धवट गुंडाळण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेचे निफाड तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांच्यासह राजेंद्र मोगल, चंद्रकांत मोरे, विजय रसाळ व इतर सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर संबंधित पदाधिकार्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळावीत, या मागणीसाठी त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांना घेराव घालत त्यांच्या वाहनांना अडवून निसाका प्रश्नावर जाब विचारला. निसाका हा निफाड तालुक्यातील शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असून, कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत सभासदांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. कारखान्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, बँकेची भूमिका, शेतकरी सभासदांचे हित आणि निसाकाच्या भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका सभासदांसमोर मांडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, काही काळ सभागृहाबाहेरही गोंधळाचे वातावरण होते. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना वाहनातून बाहेर काढण्यात आले.
जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारन सभा अर्धवट गुंडाळून प्रशासक संतोष बिडवई व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पळ काढला. गतवर्षी निफाड कारखाना विक्रीचा घाट सभासदांनी उधळून लावला होता. त्यामुळे निसाकाची सद्यस्थिती काय आहे याबाबत विचारणा करायच्या आधीच सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ व प्रशासक संतोष बिडवई यांना घेराव घालत जाब विचारला. याबाबत प्रशासकांनी तत्काळ खुलासा न केल्यास त्यांना लवकरच शिवसेना स्टाईलने धडा शिकविण्यात येईल.
– खंडू बोडके पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख निफाड
Uproar at District Bank meeting; Administrator Bidwai and Minister Zirwal gheraoed.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…