नाशिक

नांदगाव बुद्रुक येथे भेळभत्त्यामुळे विषबाधा

137 हून अधिक नागरिक बाधित; सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे रविवारी भरलेल्या आठवडे बाजारातून खरेदी केलेला भेळभत्ता खाल्ल्यानंतर 137 हून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी (दि. 28) समोर आली. चिंचावड, गुंजाळवाडी, नांदगाव बुद्रुक आणि डोंगरगाव येथील बाधित नागरिकांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयासह महिला रुग्णालय व अन्य रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाधितांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
नांदगाव बुद्रुक येथे रविवारी आठवडे बाजार भरला होता. या बाजारातून नागरिकांनी भेळ-भत्ता खरेदी केला. त्यासोबत देण्यात आलेली ओली चटणी खाल्ल्यानंतर सोमवारी सकाळपासून अनेकांना मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, पोटात जळजळ, चक्कर व तापाचा त्रास जाणवू लागला. सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अचानक मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला. परिस्थिती हाताळण्यासाठी शासकीय डॉक्टरांसह ग्रामीण भागातील तसेच खासगी डॉक्टरांनीही मदतीसाठी धाव घेतली. बाधित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी महिला रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. मोमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून, कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. रुग्णांना 24 तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
मंत्री दादा भुसे यांनी घेतली रुग्णांची भेट
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात जाऊन बाधित रुग्णांची भेट घेतली. त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली. बाधितांना आवश्यक ते सर्व उपचार तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या. दरम्यान, भेळ-भत्त्यासोबत देण्यात आलेल्या ओली चटणीमुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. घटनेची चौकशी करून कारण शोधण्यात येईल. तपासात दोषी आढळणार्‍यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री भुसे यांनी दिली.

Poisoning due to bhel bhatiya at Nandgaon Budruk

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago