१०जण गंभीर जखमी,एकाची प्रकृती चिंताजनक
दिंडोरी प्रतिनिधी
वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्या जवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरा समोर धडक झाल्याने मारुती सियाज कार मधील चार जणांचा मृत्यु झाला .आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला विनायक गोविंद क्षिरसागर.वय ३७ योगेश दिलीप वाघ.वय १८, जतिन अनिल फावडे वय २३ रा मोठा कोळीवाडा,वणी हे सियाज कार नं.एम एच ४१व्ही७७८७ ने सापुता-या कडुन वणीच्या दिशेने येत असतांना समोरुन येणारी क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने यात चार जणांचा मृत्यु झाला.समोरासमोर गाड्या धडकल्याने मोठा आवाज झाला आजुबाजुचे लोक धावले जखमींना बाहेर काढले यात विनायक क्षिरसागर हा कार मध्येच अडकून राहीला होता.अपघाताची माहिती कळताच वणी पोलीस वणीतील काही लोकांनी घटनास्थळावर धाव घेतली जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.यातील १०जण गंभीर जखमीना नाशिक येथे हलविण्यात आले आले.यात जतिन अनिल फावडे. २३याला उपचारा साठी नाशिक पाठवले होते.जिल्हा रूग्णालयातील डाॅक्टरांनी मृत घोषित केले .रविंद्र मोतीचंद चव्हाण.वय. २२ याची परिस्थीती चिंताजनक होती, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला,. क्रूझर मधील ९जण जखमी झाले आहे.क्रुझर मधील कमळी युवराज गांगोडे, वय ४०, कल्पना सुभाष सोळसे, वय १९, तुळशीराम गोविंदा भोये वय २८, ललीता युवराज कडाळे वय ३०, रोहिदास पांडुरंग कडाळे, वय २५, योगेश मधुकर सोळसे वय १५, सुभाष काशिनाथ सोळसे वय १५, देवेंद्र सुभाष सोळसे, वय ४७, नेहल सुभाष सोळसे वय ७ हे गंभीर जखमी झाले असून वणी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर १०८ व खाजगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेल्या एकमेव वैद्यकिय अधिकारी डॉ. विशाल महाले यांच्या मदतीला नेहमी प्रमाणे पांडाणे आरोग्य केंद्राचे डॉ. प्रकाश देशमुख, वणी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अनिल पवार, डॉ. अनिल शेळके, डॉ. आहेर, डॉ. योगेश पाटील, डॉ. डॉ. वैभव मोहीते आदी खाजगी डॉक्टर धावून येत त्यांनी जखमींवर उपचार केले.