वणी -सापुतारा महामार्गावर अपघातात चौघे ठार

१०जण गंभीर जखमी,एकाची प्रकृती चिंताजनक

दिंडोरी प्रतिनिधी

वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्या जवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरा समोर धडक झाल्याने मारुती सियाज  कार मधील चार जणांचा मृत्यु झाला .आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला विनायक गोविंद क्षिरसागर.वय ३७ योगेश दिलीप वाघ.वय १८, जतिन अनिल फावडे वय २३ रा मोठा कोळीवाडा,वणी हे सियाज कार नं.एम एच ४१व्ही७७८७ ने सापुता-या कडुन वणीच्या दिशेने येत असतांना समोरुन येणारी क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने यात चार जणांचा मृत्यु झाला.समोरासमोर गाड्या धडकल्याने मोठा आवाज झाला आजुबाजुचे लोक धावले जखमींना बाहेर काढले यात विनायक क्षिरसागर हा कार मध्येच अडकून राहीला होता.अपघाताची माहिती कळताच वणी पोलीस वणीतील काही लोकांनी घटनास्थळावर धाव घेतली जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.यातील १०जण गंभीर जखमीना नाशिक येथे हलविण्यात आले आले.यात जतिन अनिल फावडे. २३याला उपचारा साठी नाशिक पाठवले होते.जिल्हा रूग्णालयातील डाॅक्टरांनी मृत घोषित केले .रविंद्र मोतीचंद चव्हाण.वय. २२ याची परिस्थीती चिंताजनक होती, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला,. क्रूझर मधील ९जण जखमी झाले  आहे.क्रुझर मधील कमळी युवराज गांगोडे, वय ४०, कल्पना सुभाष सोळसे, वय १९, तुळशीराम गोविंदा भोये वय २८, ललीता युवराज कडाळे वय ३०, रोहिदास पांडुरंग कडाळे, वय २५, योगेश मधुकर सोळसे वय १५, सुभाष काशिनाथ सोळसे वय १५, देवेंद्र सुभाष सोळसे, वय ४७, नेहल सुभाष सोळसे वय ७ हे गंभीर जखमी झाले असून वणी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर १०८ व खाजगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेल्या एकमेव वैद्यकिय अधिकारी डॉ. विशाल महाले यांच्या मदतीला नेहमी प्रमाणे पांडाणे आरोग्य केंद्राचे डॉ. प्रकाश देशमुख, वणी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अनिल पवार, डॉ. अनिल शेळके, डॉ. आहेर, डॉ. योगेश पाटील, डॉ. डॉ. वैभव मोहीते आदी खाजगी डॉक्टर धावून येत त्यांनी जखमींवर उपचार केले.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

14 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago