गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
पंचवटी : प्रतिनिधी
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन आडगाव पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग करून ताब्यात घेतले.आडगाव गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सुमारे तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आडगाव पोलिस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे पोलिस हवालदार परदेशी कॉन्स्टेबल बोराटे, गोसावी दि. 16 तारखेला रात्रपाळीत कर्तव्यावर असताना, हवालदार मनोज परदेशी यांच्या पथकातील पोलिस अंमलदार प्रीतम बोराटे यांना पहाटेच्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून एका सपेद व त्यावर काळ्या रंगाचे ताडपत्रीने झाकलेल्या पिकअपमधून जनावरांची अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आडगाव टी- पॉइंट येथे आडगाव गुन्हेशोध पथकाने काही वेळ सापळा रचला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार,
सफेद पिकअप वाहन पथकाला जाताना दिसले. त्यानुसार गुन्हेशोध पथकाने पिकअप वाहनास हटकण्याचा प्रयत्न केला असता, पिकअप चालकाने वाहनाचा वेग वाढवला आणि सरळ नाशिकच्या दिशेने जाऊ लागला. आडगाव गुन्हेशोध पथकाने या वाहनाचा पाठलाग करून डी.मार्टच्या काही अंतर पुढे पिकअप वाहन (एमएच 11-एजी 3425) थांबवले. त्याची पाहणी केली असता, वाहनात चार गायी व एक नर जातीचे वासरू दाटीवाटी करून निर्दयतेने व क्रूरतेने भरलेले दिसले. वाहनचालकास जनावरांची मालकी व वाहतूक परवान्याबाबत विचारपूस करता तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागल्याने त्याच्यावरील संशय बळावल्याने गुन्हेशोध पथकाचे हवालदार मनोज परदेशी यांनी वरिष्ठांना या घटनेबाबत माहीती दिली. त्यावेळी वरिष्ठांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार आडगाव पोलिस स्टेशनचे गुन्हेशोध पथकाने संशयित पिकअप वाहन आडगाव पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले. पोलिस अंमलदार प्रीतम बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपीकडून तीन लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचनामा करून जनावरांच्या सुरक्षिततेच्या व चारापाणीच्या दृष्टीने राजलक्ष्मी गोशाळा येथे रवाना केले. हवालदार परदेशी तपास करीत आहेत.
यांनी बजावली कामगिरी
ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त परिमंडळ- 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हेशोध पथकाचे उपनिरीक्षक विकास पंचमुख, उपनिरीक्षक भगवान घोडे, हवालदार मनोज परदेशी, अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, दीपक भुजबळ, रवींद्र लिलके, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव, दीपाली शार्दूल, हवालदार इम्रान शेख, दादासाहेब वाघ, अंमलदार शक्ती पेंढारकर, सुमित शिंदे, मनोज मोरे, हवालदार देवराम सुरंजे व सदाशिव गायकवाड यांनी केली आहे.
Vehicle bound for slaughter caught
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…
सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…