बेशिस्त वाहनचालकांकडून १० कोटी १३ लाखांचा दंड वसूल

पंचवटी : वार्ताहर
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ ) बेशिस्त वाहन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून एकूण ३५ हजार ८७७ वाहनांवर कारवाई करत सुमारे १० कोटी १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली.
 नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून सन जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत एकुण ३५ हजार ८७७  वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रक्कम रूपये १० कोटी १३ लाख एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. विहीत वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणा-या वाहन धारकांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिकने केली आहे. त्यामध्ये सन २०२१- २०२२  मध्ये एकुण ( ४५९४ )  वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर सन २०२२-२०२३ मधील  ( १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ ) या सहा महिन्यात सुमारे ११ हजार ५९१  वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई नाशिक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. सन २०२१-२२  मध्ये एकुण ३ हजार ६२७  दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आलेली होती. तर २०२२ -२०२३ या वर्षातील ( १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२  ) मध्ये एकुण ३०४७ दुचाकी चालकांवर
कारवाई करण्यात आली आहे . तसेच खाजगी बस व अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात केलेल्या मोहिमेमध्ये  एप्रिल २०२१  ते सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये ४ हजार १४३  वाहनांची तपासणी करण्यात आली असुन यातील ७५६ दोषी वाहनांकडून दंड व कर स्वरूपात एकुण २० लाख ४८ हजार ९२५  रूपये इतका महसूल वसूल करण्यात आला आहे.
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago