नाशिक

सातपूर-शिवाजीनगर परिसरात वाहनचोरांचा धुमाकूळ

तीन संशयित सीसीटीव्हीत कैद

सातपूर : प्रतिनिधी
सातपूर-शिवाजीनगर परिसरातील ध्रुवनगर येथील एका अपार्टमेंटच्या आवारातून मध्यरात्री दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरीची संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. तीन संशयित युवक फुटेजमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांपैकी एकाने दुचाकी चोरून नेल्याचे दिसत आहे.
या घटनेप्रकरणी वाहनमालकाने गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही
फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून,
फुटेजमधील हालचालींची तपासणी केली जात आहे.
चोरीची घटना कॅमेर्‍यात कैद झाल्याने संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
सुरक्षित मानल्या जाणार्‍या सोसायटीच्या आवारातूनच दुचाकी चोरीला गेल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. सातपूर आणि शिवाजीनगर परिसरात वाहनचोरीच्या घटना वाढत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी, तसेच चोरीच्या घटनांमागील संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Vehicle thieves on the rampage in the Satpur-Shivajinagar area.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago