नाशिक

बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या भावावर विळ्याने वार

भराडवाडीतील चौघांविरुद्ध गुन्हा

सिडको : प्रतिनिधी
बहिणीला मारहाण होत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी गेलेल्या भावावर धारदार विळ्याने वार केल्याची घटना पंचवटीतील भराडवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद प्रकाश चव्हाण (वय 45, रा. भराडवाडी, मच्छीबाजार, फुलेनगर, पेठ रोड, पंचवटी) यांची लहान बहीण लता शेळी घरी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांची मोठी बहीण उषा कैलास जाधव, तिचे पती कैलास लालू जाधव, मुलगा बंटी कैलास जाधव आणि प्रेम कैलास जाधव यांनी संगनमताने लता यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
लता यांना वाचवण्यासाठी शरद चव्हाण गेले असता, उषा जाधव हिने कमरेला खोसलेला गवत कापण्याचा विळा काढून त्यांच्या दिशेने वार केला. हा वार शरद यांनी डाव्या हाताने अडविल्याने त्यांच्या मनगटावर खोल जखम झाली. त्यानंतर तेथून पळून जात असताना चौघांनी शिवीगाळ करून शरद चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.

Brother attacked with sickle while trying to save sister

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago