नाशिक

नाशकात शनिवार, रविवार पाणीबाणी

अत्यावश्यक कामांमुळे पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक : प्रतिनिधी
शहरात पाणीपुरवठाविषयक तसेच सिंहस्थ कुंभमेळा प्राधान्यविषयक मोठ्या स्वरूपाची महत्त्वाची व अत्यावश्यक कामे तसेच स्मार्ट सिटीमार्फत काही अत्यावशक कामे करण्यासाठी शनिवार (दि. 4) व रविवार (दि. 5) रोजी दोन दिवसांचा शटडाउन घेण्यात येणार आहे. हे दोन दिवस संपूर्ण नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नाशिक शहरातील दोन दिवसांच्या शटडाउन कालावधीत विभागनिहाय खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार आहेत.
नाशिक पूर्व विभाग
नाशिक पूर्व प्रभाग क्रमांक 30 मधील कलानगर जलकुंभ भरणारी 500 मि.मी. व्यासाची गुरुत्ववाहिनी मुख्य 700 मि.मी. व्यासाच्या गुरुत्ववाहिनीला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी 24 तास लागणार आहेत.
नाशिक पश्चिम विभाग
त्र्यंबक रोड, एबीबी सर्कल येथे मोठ्या प्रमाणात असलेले 300 मि.मी. व्यासाच्या पाइपलाइन लिकेजचे काम बंद करणे, पी अ‍ॅन्ड टी कॉलनी येथे 200 मि.मी. व्यासाचा एअर व्हॉल्व्ह बदलणे. सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे 12 तास लागतील.
नाशिकरोड विभाग
गांधीनगर व नाशिकरोेड जलशुद्धीकरण केंद्राची कामे याप्रमाणे ः नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर 900 मि.मी.एम लाइनचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार पी. एल. आडके. गांधीनगर जलशुद्धीकरण येथे रॉ वॉटर 900 मि.मी.लाइन 1200 मि.मी. पाइपलाइनवर क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार पी. एल. आडके. गांधीनगर जलकुंभाजवळ पंपाची इनलेट 700 मि.मी. व्यासाच्या पाइपलाइनवर 450 मि.मी. व्यासाच्या पाइपलाइनचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार पी. एल. आडके. सदर 700 मि.मी. व्यासाच्या पंपाच्या पाइपलाइनवर स्मार्ट सिटीमार्फत फ्लो मीटर बसविणे. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे 36 तास.
पंचवटी विभाग
पेठरोड, सप्तरंग बिल्डिंग-जवळ मखमलाबाद येथील ऊर्ध्ववाहिनीवर 600 मिमी व्यासाचे तवली डोंगर ऊर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार मे. आशिष कन्स्ट्रक्शन, पेठरोड, आरटीओ ऑफिससमोर समर्थनगर नवीन जलकुंभाचे ऊर्ध्ववाहिनीचे करणे 600 मि.मी. व्यासाचे क्रॉस कनेक्शन. मक्तेदार मे. मेघ कन्स्ट्रुवेल. पंचवटी प्रभाग क्र. 6 कुसुमाग्रज गार्डन येथे गुरुत्ववाहिनीवरील लिकेज बंद करणे. मक्तेदार संजय व्ही सूर्यवंशी. सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे 18 तास लागतील.

Water emergency in Nashik on Saturday and Sunday

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago