नाशिक

नगरसूलसह परिसरातील जलस्रोत साठे कोरडे

दुष्काळाचे सावट : शेतकरी चिंताग्रस्त, उत्पन्नात घट होण्याची शक्यता

नगरसूल : प्रतिनिधी
येवला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असताना तालुक्याला व तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला अद्यापही पर्जन्यमान खूप कमी आहे. जून, जुलै, ऑगस्ट अर्धा संपला. शेतकर्‍यांनी पिकांची लागवड केली परंतु पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली. जेमतेम रिमझिम पावसाने आजपर्यंत पिके तग धरून उभे आहेत. उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
पर्जन्यमान नसल्याने पिकांचे भवितव्य धोक्यात असल्याचे चित्र जाणवत आहे. विहिरींना जेमतेम पाणी उतरले असून, शेतशिवाराला पाणी देत असताना अनेकांच्या विहिरी उपसत आहेत. त्यात पावसाचे दिवस संपत चालल्याने शेतकरीराजा चिंताग्रस्त झाला आहे. कारण भविष्यात शेतीलाही पाणी मिळणार नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनणार आहे.
मंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून या कालव्याला गती देऊन पाटाचे काम पूर्ण करून पाण्याचा स्रोत उपलब्ध करण्यासाठी त्यांनी मांजरपाडा प्रकल्प उभारून बोगद्याद्वारे पाणी उपलब्ध केले. कालव्याला काँक्रिटीकरण करून या कालव्याद्वारे थेट डोंगरगावपर्यंत याही वर्षी पाणी आणले. परंतु, या कालव्याचे पाणी मागेच फोडून घेतल्याने प्रश्न गंभीर निर्माण झाला. पुणेगाव कालव्यातून पाणी मागणी करून उत्तर पूर्व भागाला पुरवावे, अशी मागणी जनता करीत आहेत. नगरसूल परिसरातील सर्व बंधारे व वसंत बंधारा, तांबडधोंडा बंधारा, नांरदी नदीवरील बंधारे, लेंडीनाला बंधारा, धनामाळी बंधारा मांजरपाडा कालव्याच्या पाण्याने भरण्याची मागणी सुभाष निकम यांनी
केली आहे.

येवला तालुक्याल उत्तर पूर्व भागाला दुष्काळमुक्त करण्यासाठी हा पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा नवसंजीवनी ठरणार असून, तालुक्यातील या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भुजबळ यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा नेता लाभल्याने खरोखर या उत्तर पूर्व भागाचा विकास होईल.
– संजय पाटील, माजी सभापती, कृउबा, येवला

मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी गेले दहा दिवस येवला तालुक्यात आहे. अजूनही पुढे 15 दिवस पाणी राहील अशी अपेक्षा आहे. मंत्री भुजबळ व समीर भुजबळ हे सर्वांनाच पाणी कसे मिळेल, याचा सतत आढावा घेत आहेत. अनेक बंधारे भरून झाले. राहिलेले बंधारेदेखील भरून होतील. फक्त सर्वांनी संयम धरला पाहिजे.
– डॉ. मोहन शेलार, पाणी आंदोलक

Water sources in Nagarsul and the surrounding area have run dry.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

3 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago