नाशिक

कुंभमेळा पर्वणीला त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवणार? भाविकांमध्ये संभ्रमावस्था

त्र्यंबकनगरीत गर्दीत वाढ होण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
कुंभमेळा पर्वणीच्या वेळेस मुख्य मंदिर बंद ठेवण्याचा विचार आयुक्त शेखर सिंह यांनी बोलून दाखवला आहे. मात्र, तो त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नानाच्या शेकडो वर्षांच्या परंपरेला बाधा आणणारा आहे. तसेच हजारो किलोमीटर अंतरावरून कुंभ स्नानाला येणार्‍या भाविकांना देवदर्शनाची आस असते, त्यांच्या भावना दुखावणारा आहे. मंदिरात दर्शन घेणार्‍या भाविकांच्या संख्येवर मर्यादा आहे. मात्र, त्यावर उपाययोजना न करता थेट बंदी घालण्याचा विचार आततायी ठरणार आहे. मुखदर्शन, टोकन दर्शन, कळस दर्शन तसेच एलईडी स्कीन संख्येत वाढ करणे यांसारख्या मार्गाने भाविकांना दर्शन देणे, मंदिर 24 तास खुले ठेवणे यांसारखे उपाय करण्याची आवश्यकता असताना थेट मंदिर बंद करण्याची कल्पना अत्यंत चुकीचे असल्याचे मत साधू-महंत, भाविक यांच्यामधून व्यक्त होत आहे.
त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे आखाड्यांमधून साधू शाही मिरवणुकीने कुशावर्तावर येतात. तेथे शाही स्नान करून तेथून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जातात व नंतर आखाड्यात परत जातात. या सर्व परंपरेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. त्यामध्ये हस्तक्षेप करत शासनाने बदल करण्याचा प्रयत्न झाला तर संघर्ष होऊन परिस्थिती बिघडल्याचादेखील इतिहास आहे. त्यासाठी कुंभमेळा पर्वणीला त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा विचारदेखील नको, असे साधू-महंत, भाविक यांचे मत आहे.
सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीला आलेल्या सर्व भाविकांना मुख्य मंदिरात दर्शन घेणे शक्य होणार नाही. मंदिरातील एका दिवसाची दर्शन क्षमता 15 हजारांच्या आसपास आहे. दर्शनपथाच्या नावाने होत असलेली मोडतोड, खर्च व्यर्थ जाणार आहे, यात शंकाच नाही. मात्र, भाविकाला दर्शनदेखील मिळणार नसेल तर कुंभमेळ्याला यायचे कशाला, असा प्रश्न निर्माण होणे
साहजिक आहे.

गैरसोयीत वाढ होईल
श्रावण महिना संपल्यानंतर काही महिने अंतर्गत कामांसाठी मंदिर बंद ठेवणे हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यामुळे सध्याच्या गर्दीत वाढ होऊन भाविकांच्या होणार्‍या गैरसोयीत वाढ होईल. त्र्यंबकेश्वर शहरात चालण्यास रस्ते नाहीत, स्वच्छतागृह नाहीत, अशा परिस्थितीत अचानक गर्दीत वाढ झाल्यास आवर घालयचा कसा? असा प्रश्न स्थानिक प्रशासनापुढे निर्माण होईल.

कुंभमेळा पर्वणीला आखाडे मंदिर बंद ठेवण्यास कधीही मान्यता देणार नाही. कुंभस्नानाला आलेले भाविकदेखील मंदिरात दर्शनासाठी इच्छा मनात ठेवून येतात. त्यांना दर्शन बंद ठेवण्याची कल्पनादेखील करता येत नाही.
– स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष, आनंद आखाडा

Will the Trimbakeshwar Temple remain closed during the Kumbh Mela auspicious occasion? Confusion prevails among devotees.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago