नाशिक

अपुर्‍या मनुष्यबळाचा पाणीपुरवठ्याला फटका

46 अभियंत्यांचा भार अवघ्या 20 जणांवर

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील पाणीपुरवठ्यावरून प्रत्येक महासभेत नगरसेवकांकडून प्रशासनाचा पंचनामा केला जात आहे. मात्र, अद्याप शहरातील पाण्याची परिस्थिती सुधारत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महपालिकेत अभियंत्यांच्या 110 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. परंतु 14 अभियंत्यांनाच या विभागात नियुक्ती देण्यात आली. परिणामी या विभागात मनुष्यबळाची तूट जैसे थे आहे. तसेच 46 अभियंत्यांचा भार अवघ्या 20 जणांवर असल्याने काम करताना मोठी कसरत या विभागाला करावी लागत आहेत.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत सिडकोतील नगरसेवकांनी पाण्यावरुन तीव्र संताप व्यक्त केला. दररोज कमी दाबाने पाणीपुरवठा, अनियमित पाणी, जलवाहिनी गळती, पाणीटंचाई तसेच विविध भागांतील तांत्रिक अडचणींचे प्रश्न सदस्यांकडून उपस्थित केले जातात. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केवळ नवीन अभियंत्यांची नियुक्ती करून भागणार नसून, मंजूर पदांनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणार्‍या बिगारींची संख्या अत्यल्प असल्याने दुरुस्ती आणि देखभाल कामांवरही त्याचा परिणाम होतो. महापालिकेत नव्याने भरती झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांपैकी 14 अभियंत्यांचे पाणीपुरवठा विभागासाठी वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अभियंत्यांचे इतर विभागांमध्ये वाटप करण्यात येत आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागातील मंजूर पदांच्या तुलनेत विद्यमान कर्मचारीसंख्या अद्याप मोठ्या प्रमाणात अपुरी दिसत आहे.

सिंहस्थापूर्वी परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्याचे दिव्य महापालिकेसमोर असणार आहे. सध्या अमृतअंतर्गत शहरातील जलवाहिन्यांच्या विस्ताराचे काम सुरू आहे. यानंतर पाणीपुरवठ्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. पण यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ असल्याशिवाय पर्याय नसेल. ही बाब प्रशासनाला ध्यानात घ्यावी लागेल.

 

Water supply hit by staff shortage

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

1 day ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

1 day ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

1 day ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

1 day ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

1 day ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

1 day ago