नाशिक

एक्स्लो पॉइंटला पावसाचे पाणी दुकानांत; व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

रस्ता उंच झाल्याने पाण्याचा प्रवाह दुकानांकडे; निचर्‍याची व्यवस्था करण्याची मागणी

सिडको : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी दुपारच्या सुमारास शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे एक्स्लो पॉइंट परिसरातील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. पावसाचा जोर वाढताच परिसरातील पाणी दुकानांमध्ये घुसल्याने अनेक व्यावसायिकांचे साहित्य पाण्याखाली गेले. रॉ मटेरिअल, इलेक्ट्रिक उपकरणे आणि औद्योगिक वापराचे साहित्य खराब झाल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
एक्स्लो पॉइंट चौकात सध्या रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान रस्त्याची पातळी वाढल्याने दुकानांच्या तुलनेत रस्ता उंच झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी दुकानांच्या दिशेने येत असल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे. सोमवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर हे पाणी थेट दुकानांमध्ये शिरले.
पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी निचर्‍याची स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकांनी यापूर्वी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना न झाल्याने यंदाच्या पावसात पुन्हा हीच परिस्थिती निर्माण झाली.
दुकानांमध्ये पाणी शिरल्याने साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. रस्त्याचे काम करताना परिसरातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग आणि दुकानांची पातळी यांचा विचार करण्यात आला का, असा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून योग्य निचरा व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील व्यावसायिकांनी केली आहे.

Rainwater enters shops at Exlo Point; business owners suffer losses worth lakhs.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

1 day ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

1 day ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

1 day ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

1 day ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

1 day ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

1 day ago