नाशिक

द्वारका परिसरात पुन्हा दोन वेळा पाणीपुरवठा

नगरसेवकांच्या भेटीनंतर महापौरांचे निर्देश; नागरिकांचे हाल पाहता निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
चाचणीच्या नावाखाली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने द्वारका परिसरातील दोन वेळा होणार पाणीपुरवठा एकदा करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या निर्णयामुळे द्वारकाच्या प्रभाग 15 मधील नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने प्रशासनाने तत्काळ पुन्हा दोन वेळा पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा करण्याची मागणी नगरसेवक प्रथमेश गिते व सीमा पवार यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडे केली.
नागरिकांचे होणारे हाल महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर महापौरांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांना पुन्हा दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले.
महापौर आडके यांनी द्वारका परिसरातील नगरसेवकांनी सोमवारी बैठक घेतली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका प्रियंका माने व धनंजय माने यांनी निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन द्वारका परिसराला दोनदा पाणीपुरवठा केला जात असल्याने त्यांनी सदर पाणीपुरवठाच बंद केला होता.
यानंतर मात्र नगरसेविका सीमा पवार यांनी महासभेत द्वारका भागाला कोणी पाणी देईल का? असा सवाल उपस्थित केला होता. यामुळे दोन विभागातील नगरसेवक समोरासमोर ठाकले होते. त्यातच पाणी पुरवठा विभागाने द्वारकेला दिवसातून एकदाच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. परंतु यामुळे लाखो लोकांना फटका बसत असल्याचे चित्र होते. नागरिकांकडे पाणी साठवण्याची सुविधा नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. द्वारका भागातील पाणीपुरवठा एकवेळ केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक प्रथमेश गिते व सीमा पवार यांनी सोमवारी महापौर आहेर-आडके यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली व तातडीने दोनवेळा पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.
महापौरांनी लोकभावना लक्षात घेत, द्वारका परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहे. याबरोबरच त्यांना संबंधित विभागास पंचवटीतील पाणीपुरवठा वाढविण्याचेही निर्देश दिले अहे. त्यानुसार या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

द्वारका परिसरात एक वेळा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याप्रकरणी नागरिकांच्या भावना पाहून येथील पाणीपुरवठा पुन्हा दोन वेळा करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पंचवटीतदेखील अधिक प्रमाणात व सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांना केल्या आहेत.
-हिमगौरी आहेर-आडके, महापौर

Water supply in Dwarka area again twice

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago