नाशिक

नाशिकचा कायापालट करू; बाहेरचा पालकमंत्री ही टीकाच निरर्थक

♦ पालकमंत्रिपदी दुसर्‍यांदा नियुक्तीबद्दल आपली भावना?
उत्तर : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा सोपवलेली आहे. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व व मुख्यमंत्री यांचे मनापासून आभार. कुंभमेळा तथा पालकमंत्री या दोन्ही जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन.
♦ कुंभमेळ्यामुळे नाशिककरांना कसा फायदा होणार?
सिंहस्थ कुंभ हा विकासाची एक सुवर्णसंधी नव्हे तर विकास पर्वणीच आहे. ह्या निमित्ताने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे शहराचा दर्जा उंचावेल. पर्यटन वाढेल, रोजगारनिर्मिती होईल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल. दळणवळण सुलभताः पर्यटनवाढ, हेरिटेज विकास. स्थानिक रोजगार यात प्रचंड संधी. शहराचा दर्जाः देशपातळीवर नाशिक एक ‘आधुनिक आध्यात्मिक शहर’ म्हणून उभे राहील. नाशिक रोड आणि देवळाली स्थानकांचे अपग्रेड नाशिक-त्र्यंबक रस्ता 6 पदरी, रिंग रोड, द्वारका सर्कल अपग्रेड. स्मार्ट सिग्नल, व्हेईकल ट्रॅकिंग, व्हर्चुअल रूट मॅप्स उपलब्ध होतील. कुंभ काळात विशेष ट्रेन चालवण्यात येतील. नाशिक-त्र्यंबक मार्ग 6 पदरी केला जात आहे. त्यामुळेच कुंभमेळा संपल्यानंतरही त्याचा फायदा मिळेल.
♦ भाविकांच्या सुरक्षेसाठी काय तयारी आहे ?
उत्तर :- हे एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील आव्हान आहे. आम्ही अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. शाही स्नानाचे दिवस खास लक्षात घेऊन, त्या दिवशी येणार्‍या गर्दीसाठी नियंत्रित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे आम्हाला लाईव्ह फीड मिळेल. पोलिसांना विशेष मॅनेजमेंट मोबाईल अ‍ॅप दिले जाईल ज्याद्वारे ते गर्दीचे प्रेशर पॉईंट्स ओळखू शकतील. ड्रोनद्वारे रिअल टाइम ट्रॅकिंग. प्रत्येक आखाड्याशी समन्वय ठेऊन प्रवेश/निर्गमन वेळ निश्चित करणं सुलभ होईल.
♦ आपत्कालीन परिस्थितीसाठी काय प्लॅन आहे?
उत्तर : सिंहस्थ कुंभ हा एक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा सोहळा आहे. त्यामुळे अनेक व्हिआयपी मंडळी आणि धर्मगुरू येणार आहेत. त्यांची सुरक्षितता हा आमचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. यासाठीएसपीजी, एनएसजी दर्जाची सुरक्षा रचना आखण्यात आली आहे. काही ठिकाणी हेलिपॅड्स उभारण्यात येतील. विशेष बुलेटप्रूफ वाहने, स्वतंत्र सुरक्षा रूट आणि तत्काळ प्रतिसादासाठी कंट्रोल रूम उपलब्ध असेल. अतिवृष्टी, पूर, नदीपात्रातील पाणी वाढणे, आग, गर्दीचे व्यवस्थापन आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती यांचा विचार करून नियोजन केले जात आहे.
♦ त्र्यंबकेश्वर रुग्णालय आणि इतर आरोग्य सुविधा कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणार का
उत्तर :- त्र्यंबकेश्वर निश्चितच जागेचा प्रश्न आहे आणि त्यात जुने रुग्णालय शहरात असल्यामुळे गर्दी व त्याची नियोजन करणे आवश्यक होते म्हणून नवीन रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना तसेच रुग्णांना अडचण होईल हे नाकारता येऊ शकत नाही. मात्र, कायमस्वरूपी व्यवस्था होणे आवश्यक होते.आवश्यकतेनुसार खाजगी रुग्णालय देखील शासन अधिग्रहित करेल, निश्चितच निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही.
♦ शेतकरी, उद्योग आणि पर्यटनाला कसे बळ देणार ?
उत्तर : माझ्या दृष्टीने सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर नाशिकच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारी एक ऐतिहासिक संधी आहे. या कुंभाच्या माध्यमातून आपण शेतकरी, उद्योग आणि पर्यटन या तीनही क्षेत्रांना एकमेकांशी जोडून त्याचा थेट फायदा नाशिकच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवू शकतो.कोट्यवधी भाविकांमुळे स्थानिक कृषी उत्पादनांसाठी मोठी आणि थेट बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. ‘फार्म टू फेस्टिव्हल’ संकल्पना राबवता येईल. शेतमालाचे प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करण्याला चालना मिळेल. त्यामुळे कुंभाचा आर्थिक फायदा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता गावागावातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.कुंभाच्या माध्यमातून हॉटेल, वाहतूक, फूड प्रोसेसिंग, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, किरकोळ व्यवसाय, डिजिटल सेवा, स्वच्छता सेवा अशा अनेक क्षेत्रांत मागणी वाढेल.
♦ सरकार, आखाडे, साधू-महंत आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय कसा साधला जात आहे?
उत्तर :- हो, निश्चितच. वर्षभरापासून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सातत्याने आढावा घेत आहे केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थित देखील नागपूर येथे नक्कीच बैठक झाले आहे त्यांनीदेखील काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत व निर्णय घेतले आहेत. 2027 सालचा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक पर्व नाही, तर महाराष्ट्राच्या व्यवस्थापन क्षमतेचा जागतिक स्तरावरचा टेस्ट केस असणार आहे. मी नाशिकमध्ये बसून केवळ बैठका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यावर आणि अधिकार्‍यांकडून काम करून घेण्यावर भर देतो. विश्वास हा भाषणातून नाही, तर कामातून निर्माण होतो. त्यामुळे मी नाशिककरांना आश्वासनांपेक्षा कामाचे परिणाम दाखवू इच्छितो. कुंभाच्या निमित्ताने तयार होणार्‍या सुविधा केवळ 2027 पर्यंत मर्यादित राहणार नाहीत; त्या पुढील अनेक वर्षे नाशिककरांच्या उपयोगी पडल्या पाहिजेत. नाशिकचा कायापालट हा कुंभाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि अलीकडेच मी नाशिकच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नाशिक माझी जन्मभूमी असून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. नाशिकची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे; आणि जबाबदारी जिथे मिळते, तिथे मनापासून काम करणे ही माझी कार्यपद्धती आहे. नाशिककरांनी मला पदाच्या नावाने नाही, तर माझ्या कामाच्या परिणामाने मोजावे. कुंभमेळा यशस्वी झाला, नाशिकचा विकास झाला आणि नाशिककरांच्या चेहर्‍यावर समाधान दिसले तर त्यापेक्षा मोठे प्रमाणपत्र माझ्यासाठी दुसरे कोणतेही नाही. कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्याकडे आहे; पण हा कुंभ नाशिककरांचा आहे. त्यामुळे निर्णय घेताना नाशिककरांचा सहभाग, त्यांच्या भावना आणि त्यांच्या अपेक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य राहील. यात कोणतीही शंका नाही. मी बाहेरचा आहे नाशिकची माहिती नाही, बाहेरचा पालकमंत्री आहे. ही केली जाणारी टीका निरर्थक आहे. मला बाहेरचा समजू नका. कुंभमेळ्याच्या कामातून नाशिकला चांगल्या दर्जाचे शहर बनविण्याचा आपला
मानस आहे.

We will transform Nashik; the criticism regarding an ‘outsider’ Guardian Minister is baseless.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago