दि. 21 ते 27 डिसेंबर 2025
पुरुषोत्तम नाईक

मेष : लाभदायी सप्ताह
या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. बुध प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. शेअरमध्ये लाभ होईल. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना त्रासदायक ठरणारा हा सप्ताह आहे. बांधकाम व्यावसायिकांना हा सप्ताह लाभदायी ठरेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आरोग्याबाबत सतर्क रहा. कुपथ्य टाळा.
वृषभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. शेअरमध्ये गुंतवणूक टाळा. प्रवास टाळा, प्रकृती जपा. वाहन जपून चालवा.
मिथुन : आडाखे अचूक ठरतील
या सप्ताहात बुध, शनि, मंगळ, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. मन अस्वस्थ राहील. मनावर संयम ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक वादविवाद सामंजस्याने सोडवा. प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क : प्रवास टाळा
या सप्ताहात बुध, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात धनचिंता सतावतील. खर्च वाढेल. नोकरदारांना सावध भूमिका उपयुक्त ठरेल. विरोधक त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. प्रकृतीची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.
सिंह : यश प्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अनुकुलता प्रदान करणारा हा सप्ताह आहे. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या : संयम बाळगा
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी खूप संयम बाळगून अडचणींना तोंड द्यावे. वादविवाद टाळावे. व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील.
तूळ : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांची उधारी वसूल होईल. भाग्योदयकारक घटना घडतील.
वृश्चिक : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात राहतील. पैशांचे नवे स्त्रोत सुरू होतील. नोकरदारांच्या मनाविरुध्द गोष्टी घडतील. व्यापारी, व्यावसायिकांचे नवीन आस्थापने सुरू होतील. प्रकृती जपा.
धनु : अनुकूलता मिळेल
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. मनावर संयम ठेवा. वादविवाद टाळा. परिस्थिती समजून निर्णय घ्या. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूलता मिळेल. प्रकृती चांगली राहील.
मकर : नफा वाढेल
या सप्ताहात बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांचे नफ्याचे प्रमाण वाढेल. विरोधक त्रस्त करतील. आरोग्य सांभाळा.
कुंभ : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची आर्थिक प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळतील. मानसिक अस्वास्थ्य राहील. सुखवार्ता कळतील. आरोग्य चांगले राहील.
मीन : प्रगती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना वादविवादाला तोंड द्यावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य राहील. व्यापारी, व्यावसायिकांची प्रगती होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. आरोग्य चांगले राहील.

Weekly Horoscope
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

4 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

16 minutes ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

53 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

1 hour ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

23 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

23 hours ago