दि. 19 ते 25 एप्रिल 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : धनचिंतांना उतार
या सप्ताहात शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. मंगळ, रवी, बुध प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. शेअरमध्ये लाभ होतील. प्रकृती जपा.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन यशस्वी होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. कुठल्याही मोहात पडणे टाळा. प्रकृती चांगली राहील.
मिथुन : वाद टाळा
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. शुक्र प्रतिकूल आहे. गुरू संमिश्र आहे. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शानशौकीत पैसे खर्च कराल. नोकरदारांचे धाडस यशस्वी होईल. वाद टाळा. व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. मानसिक अस्वस्थ्य जाणवेल. सन्मानप्राप्ती होईल. प्रकृती जपा.
कर्क : जोरदार आगेकूच
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर टाळणे इष्ट ठरेल. नोकरदारांच्या योजना चुकतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शेअरमध्ये लाभ होतील. प्रकृती सांभाळा.
सिंह : बढती मिळेल
या सप्ताहात रवी, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. मंगळ, बुध, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वास्थ्य वाढविणार्या घटना घडतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांना बढती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळणार नाहीत. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे अडचणीचे ठरेल.
कन्या : व्यवसायवृद्धी
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या कामातील चुका अडचणीत आणतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृद्धी होईल. कौटुंबिक वादविवाद टाळा. मनावर संयम ठेवा. प्रकृती जपा.
तूळ : प्रवास टाळा
या सप्ताहात बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शुक्र, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्तिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी जाणवतील. व्यापारी, व्यावसायिकांना विरोधक त्रस्त करतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रकृती जपा.
वृश्चिक : समीकरणे जुळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमरे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळतील. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवल. कौटुंबिक सुखसंवाद मनाला आनंद देतील. प्रकृती जपा.
धनु : कामे मनाप्रमाणे होतील
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. शुक्र, मंगळ, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी त्रस्त करतील. खर्च वाढतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. नोकरदारांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना कुणावर विसंबून निर्णय घेणे टाळावे. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे मनाप्रमारे होतील. आरोग्याबाबत दक्ष राहा.
मकर : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. विरोधकांच्या कारवायांना खीळ बसेल. नोकरदारांना सुखवार्ता कळतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील. आरोग्यप्रश्नांची काळजी घ्या. दुर्लक्ष करणे अडचणीचे ठरेल.
कुंभ : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारां पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या नफ्याचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वाद टाळा. समझोत्याचे धोरण स्विकारा. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे मार्गी लागतील. आनंदवार्ता कळतील. प्रकृतीबाबत दक्ष रहा.
मीन : योजना मार्गी लागतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणीतून सुटका होईल. पैशांचे स्रोेत सुरू होतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या नवीन योजना मार्गी लागतील. शेअरमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. मनावर ताबा ठेवा. संयम पाळा. वाद टाळा.
Weekly Horoscope
आजचा सूर्योदय एका आगळ्यावेगळ्या ऊर्जेचा साक्षीदार असेल. गेल्या वर्षभरापासून अन्नाचा त्याग करून केवळ आत्मिक शक्तीच्या…
संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत नसतानाही सरकारने लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के…
40 पार तापमानामुळे पिके होरपळली! नाशिक : विशेष प्रतिनिधी आजपासून ‘सौर ग्रीष्म ऋतू’ सुरू होत…
अंधशाळेतील निदेशकाची नियुक्ती वादात नाशिक : प्रतिनिधी मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित गंभीर प्रकार समोर आला…
तीन हजार दुचाकी, दीड हजार चारचाकींची विक्री; 450 फ्लॅट्सचे बुकिंग नाशिक : प्रतिनिधी साडेतीन मुहूर्तार्ंपैकी…
♦ अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत ♦ पुढील तीन दिवस पावसाचासुद्धा इशारा ♦ विदर्भ,…