दि.26 जुलै ते 1 ऑगस्ट2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : आर्थिक प्रगती
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, गुरू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आर्थिक समस्या सुटतील. अडकलेले पैसे वसूल होतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक प्रगती होईल. अचानक धनलाभाचे योग यावेत. प्रशासकीय कामात अडथळे येतील. आरोग्य जपा.
वृषभ : पैसे मिळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी सावध भूमिका ठेवणे आवश्यक ठरेल, अन्यथा कारस्थानांना बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांना पैसे मिळतील. प्रकृती जपा.
मिथुन : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. शेअरमध्ये सावधपणे गुंतवणूक करा. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. प्रकृती जपा.
कर्क : आर्थिक विवंचना
या सप्ताहात शुक्र, मंगळ, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक विवंचना त्रस्त करतील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. मानसिक अस्वस्थता त्रस्त करेल. अध्यात्मिक कामात सहभागी व्हाल. आरोग्यप्रश्न सतावतील.
सिंह : संघर्ष टाळा
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी, गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी संघर्ष टाळावे. व्यापारी, व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील. आरोग्यप्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करता काना नये.
कन्या : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात शनि, रवी, मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. धनचिंता सतावतील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय योग्य ठरतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. प्रेमीजनांना अनुकूलता प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील.
तूळ : व्यवसायवृध्दी होईल
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शनि, मंगळ प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिवकांची व्यवसायवृध्दी होईल. शेअरमध्ये क्वचित लाभ होईल. प्रकृती जपा. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा.
वृश्चिक : अडचणी सौम्य होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च किंचित वाढतील. नोकरदारांच्या अडचणी सौम्य होतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या आर्थिक फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. कौटुंबिक वादविवाद टाळा, आरोग्याची काळजी घ्या.
धनु : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अनुकूलता प्राप्त होईल. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अनुकूलता प्राप्त होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या.
मकर : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, शुक्र, राहू,केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची प्रगती होईल. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. मंगलवार्ता कळतील. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, शुक्र अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहे. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी संयम पाळणे गरजेचे आहे. राहत्या घराचे प्रश्न सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य चांगले राहील.
मीन : अनुकूलता मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.

Weekly Horoscope

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

18 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago