नाशिक

ओझरखेड धरण ओव्हरफ्लो

दिंडोरी तालुक्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून, संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. तालुक्यातील 50 हून अधिक गावे तसेच वणी आणि दिंडोरी शहराची तहान भागवणारे महत्त्वाचे ओझरखेड धरण 100 टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. खबरदारी म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास पुढील दोन-तीन दिवसांत इतर धरणेही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
सततच्या पावसाने धामण नदीला पूर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दिंडोरी शहरातील मुख्य पुलावरील वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दिंडोरी ते पालखेड रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या पर्यायी रस्त्याची पावसाने दुरवस्था झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पालखेड धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून कादवा नदीपात्रात 2,052 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
या पावसामुळे टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारख्या पिकांना आणि नुकत्याच झालेल्या पेरण्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, नद्या-नाल्यांना आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यात उतरणे टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Ozharkhed Dam Overflows

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

18 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago