जग युद्धग्रस्त असताना नेते मात्र निवडणुकीत व्यस्त

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांचे युद्ध 40 दिवसांनंतर दोन आठवड्यांसाठी सीझफायर घोषित करून थांबवण्यात आले. जगाने सुटकेचा निःश्वास टाकला. कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल. शहरांना उद्ध्वस्त करणारे, घरादाराची राखरांगोळी करणारे हे विनाशकारी युद्ध थांबवावे. नवे शांती सहकार्य व सहजीवनाचे पर्व सुरू व्हावे यासाठी जग प्रार्थना करत आहे. इराणचे प्रमुख शहरे उजाड करण्यात आली. तेल प्रकल्प व संचार माध्यम उदध्वस्त झाली. सर्वत्र मृत्यूचे तांडव, जळत असलेत्या आलिशान इमारती ज्यांना सोडून रहिवासी बंकरमध्ये आश्रयास आले आहेत. तबाही आणि बरबादी याचे दृश्य बघायला मिळत आहे.
इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळ उडवून दिले आहे. युद्धबंदीच्या करारात लेबनॉनचा समावेश नसल्याने इस्रायलने हिजबुल्लाह या आतंकी गटाला खतम करण्याचे मिशन सुरू ठेवले आहे. लेबनॉन व बैरत या राजधानीच्या शहरांची इस्रायलने अशरक्षः तबाही करून हे शहर खंडर बनवले आहे. उजाड व भकास शहरांचे सांगाडे युद्धाची तीव्रता व युद्धपिपासू वृत्ती दाखवत आहे. नंताश, बोर्डो व इस्फहान ही शहरे पूर्णपणे भकास झाली आहेत. येथील डोंगरांच्या तळाशी पाचशे किलोमीटर आत इराणने समृद्ध केलेले युरेनियम व मिसाइल्स यांचे भंडार साठवले आहे. अमेरिकेच्या बी-52 या घातक विमानांंनी दोन हजार पौंडाचे बंकर बस्टर बॉम्ब फेकले. खोलवर भूमीच्या गर्भात सुरक्षित साठवलेले अस्त्र निकामी करण्यात अमेरिका नाकाम ठरला आहे.
इराणची सत्ता अयातुल्ला खामेनीच्या पुत्राने संभाळली आहे. मुज्तजाब
खामेनी हा वारस सत्ताधारी बनल्याने अमेरिकेचे सत्तापरिवर्तनाचे लक्ष्य अपूर्ण राहिले. युरेनियम समृद्धीकरण देशाच्या विकासासाठी चालू राहील. इस्रायलने लेबनॉनवर हल्ले थांबवावेत त्याशिवाय शांततेबाबत चर्चा सफल होणार नाही, हा दावा इराणने केला आहे. आपले समृद्ध केलेले युरेनियम रशियाच्या ताब्यात देण्यास इराण राजी झाला आहे. दि. 11 एप्रिल 2026 रोजी पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबाद शहरात इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराची, अमेरिकेचे उपराष्ट्रमंत्री जेडी व्हान्स, परराष्ट्रमंत्री मार्क रोबियो व दोन्ही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 21 तास दोघांत वाटाघाटी झाल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ व लष्करप्रमुख आसिफ मुनीर त्याठिकाणी उपस्थित होते. जगाची एक भयानक विनाशकारी लढाई थांबण्यासाठी दोघांना एकत्र आणण्याचे श्रेय पाकिस्तानला मिळाले.
जगभर शांतता घडवून आणण्याची पाकिस्तानची मध्यस्थी गौरवली गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानची प्रशंसा केली. इराणनेदेखील पाकिस्तानच्या या शांतता उपक्रमाला दाद दिली. या मध्यस्थीने पाकिस्तानने जगात वाहवा मिळवली. शांतता व स्थैर्य नांदण्यासाठी पाकिस्तानचे नेते पुढे आले. युद्ध चेतवणारे नाही तर युद्ध शमवणारे म्हणून पाकची ओळख झाली. सर्व जग युद्धाने ग्रस्त असताना जगभर मिठ्या मारत फिरणारे नेते पक्षाच्या प्रचारात व्यस्त होते. पाच राज्यांत निवडणुका आहेत. त्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. जयशंकर म्हणाले, की आम्ही दलाली करत नाही. अमेरिकेची हुजरेगिरी व दादागिरी यांच्यापुढे झुकणारे परंपरागत विश्वासाचा मित्र इराण याला साथ देत नाहीत. सर्व मुस्लिम राष्ट्रे पाकिस्तानच्या मागे ठाम उभे असतांना इराणने भारताला नेहमी भक्कम साथ दिली. त्याच्या सर्वश्रेष्ठ नेत्याला खतम केले तेव्हा दोन ओळी सांत्वनपर शब्दाने व्यक्त केल्या नाहीत. इराणचे जहाज भारताच्या आमंत्रणाने विशाखापट्टणम् येथे युद्धसरावासाठी आले. ते अमेरिकेने बुडवले. त्याला वाचवणे भारताचे कर्तव्य असताना निषेधाचा साधा सूर उमटवला नाही. इस्रायल दुखावला जाऊ नये म्हणून भारताने एक घनिष्ठ मित्र गमावला आहे. भारत अमेरिकेच्या शिबिरात का वळला आहे? काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला रशिया दूर करून लबाड व अवसानघातकी अमेरिकेच्या आधीन भारत गेला आहे. रशियाने कुठल्याही स्तरावर अमर्यादित सहकार्याचे आश्वासन दिले होते. चीनला अनेक वेळा माघार घेण्यास रशियाने भाग पाडले होते. अशा संकटात अतूट व अखंड, अमर्यादित साथ देणार्‍या रशियाला दुखवून भारताने एकमेव दोस्त गमावला आहे. जग जळत असताना, लोकांच्या गॅस शेगड्या बंद झाल्या असताना, प्रचारसभांत पक्षाकरिता लढत होते. सिंधुरच्या वेळी केरळ राज्यात व आता आसाम, बंगाल राज्यात पाय रोवण्यासाठी व एकछत्री अमर्यादित सत्ता स्थापण्यासाठी पक्ष
सर्वोपरी ही वागणूक आहे. देश सर्वोपरी, देशसे बढकर कोई नहीं हा नारा आहे, विचारधारा आहे. वास्तवात सत्तेपेक्षा काही मोठे नाही. सत्ता ही सर्वोपरी मानली जात आहे. राष्ट्रहिताचा घात होत आहे. अमेरिकेची साथ इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मन यांनी सोडली. तुमची लढाई आमच्यावर लादू नका, हे नाटो देशांनी ठणकावून सांगितले.
भारत कोणत्या कारणाने अमेरिकेची पाठराखण करतो? अमेरिकेत 70 टक्के लोक युद्धावर नाराज आहेत. इराणपासून, त्याच्या अणुकार्यक्रमापासून अमेरिकेला भीती नसताना इस्रायलच्या दबावाखाली ट्रम्प यांनी जगात लढाईचे वणवे पेटवले आहेत. भविष्यात अमेरिकेचे तुकडे होणार आहेत. अमेरिकेच्या पक्षात जाऊन बुडणार्‍या बोटीत भारत बसला आहे. रशिया, चीन, इराण, साउथ कोरिया यांची युती जगावर नियंत्रण मिळवणार आहे. तेव्हा भारताने अमेरिकेची भीती सोडून रशियाशी प्रीती वाढवावी, हा जनमानस आहे. लोकांच्या मागणीला व मताला चिरडून अमेरिकेची आरती उतरवण्याची परवशता देशाने सोडून द्यावी. भरकटलेल्या दिशाहीन पराराष्ट्र धोरणाची दिशा बदलावी. आंतरराष्ट्रीय व्यवहारात भारताचा दबदबा वाढवावा.
हॉर्मुझ सामुद्रधुनी जगाच्या जहाजांसाठी मोकळी करावी, यासाठी अमेरिका आग्रही आहे. हार्मुझवर आपला अधिकार आहे. येथून जाणारे दुष्मन देशाचे जहाज डुबवले जाईल, अशी धमकी इराणने दिली आहे. चीनचा तेल व गॅसचा व्यापार येथून चालतो. आपल्या जहाजांना अमेरिकेने इजा केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम चीनने भरला आहे. कालच चीनची तीन जहाजे हार्मुझ बंदरातून बाहेर पडली. अमेरिका चीन व रशियाच्या नादी लागत नाही. आपल्या हिताच्या आड येऊन अमेरिका भारताच्या व्यापारावर, कृषी उत्पादनावर निर्णय घेऊ लागला तर भारत त्याच्याविरुद्ध अटळपणेे उभा राहिला नाही. दहा कोटींचा इराण आपापसातील सारे मतभेद विसरून खंबीर नेतृत्वाला साथ देत आहे. लढण्याची जिद्द व राष्ट्रासाठी सर्वस्व त्यागाची ही भावना इराणला लढवत आहे.
स्वातंत्र्यासाठी एकीने झुंजण्याची मानसिकता इराणच्या झुंजारी जनतेने जगाला दाखवून दिली. ट्रम्प यांनी इराणची शेवटची रात्र घोषित केली. इराणला पाषाणयुगात पाठवण्याची निर्णायक युद्धाची तुतारी फुंकली. त्या रात्री इराणी जनता रस्त्यावर उतरली. मोठे प्लँट, व पूल यावर इराणचे कलाकार संगीत वाजवायला लागले. हे एकीचे बळ, देशासाठी मिटण्याची ही हिमंत व निर्धार इराणने दाखवला. 140 कोटींचा हा देश 20 कोटी अमेरिकेच्या पायाशी लोटांगण घालतो, हेच भारतीयांना खुपते आहे. रशिया, चीन व कोरिया आणि आता तुर्की इराणकडून रणांगणात उतरणार आहे. जग तिसर्‍या जागतिक युद्धात ढकलले जात आहे. अशा निर्वाणीच्या वेळी भारताने बघ्याची भूमिका घेऊन उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू नये.

While the world is at war, leaders are busy with elections

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *