महाराष्ट्र

युक्रेनला रक्ताच्या लाथोळ्यातून कोण वाचविणार?

दृष्टिक्षेप

रमेश लांजेवार

रशिया-युक्रेन युद्ध वेळीच थांबले नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो. आज रशिया-युक्रेन युद्धाला 48 दिवस लोटून गेले तरीही युक्रेनमधील रक्तपात थांबलेला नाही. पुतिन यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण युक्रेन स्मशानभूमी बनून खंडर झाली आहे. अमेरिका व रशिया हे युद्ध थांबविण्याच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट दिसून येते. ही बाब युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांच्या लक्षात अजूनपर्यंत आलेली नाही. यामुळेच आज युक्रेन पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.कारण रशियाला युक्रेन पाहिजे आहे. परंतु युक्रेन रशियाच्या कब्जात जाऊ देणार नाही या पद्धतीने अमेरिका आपली खेळी खेळत आहे. याकरिता अमेरिकेने जेलेन्स्कीला आपला मोहरा बनविला आहे. परंतु यात लाखोंच्या संख्येने युक्रेन नागरिक मरत
आहेत त्यांचे काय? बलाढ्य देशांच्या वर्चस्वाच्या लढाईत युक्रेनमधील निरापराध्यांचा बळी का जावा? रशिया-युक्रेन संघर्षामुळे लाखोंच्या संख्येने लोकांनी आपले घरदार सोडून पलायन करून शेजारच्या देशामध्ये आश्रय घेतला आहे. या युद्धात अनेकांनी आपले आप्त-नातेवाईक मोठ्या प्रमाणात गमाविले आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा अमेरिका व चीन घेत आहे, ही बाब जगजाहीर आहे. तरीही युनो शांत बसलेला दिसून येतो. रशियाच्या हेकेखोरीमुळे तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी केव्हाही व कधीही उडू शकते. कारण रशिया-युक्रेन युद्ध हे आता युक्रेनपुरतेच सीमित नसून, अमेरिका व नाटो यांच्याविरुद्ध रशिया असे युद्ध झाले आहे. कारण अमेरिका, ब्रिटनसह नाटो देश युक्रेनला संपूर्ण युद्धसामग्रीचा मोठ्या प्रमाणात मदत करीत आहे. ही बाब रशिया चांगल्याप्रकारे जाणतो. अशा परिस्थितीत रशियाकडून युक्रेन युद्धाची परिस्थिती आवाक्याबाहेर गेली तर रशिया अवश्य अणुबॉम्बचा वापर करेल याला नाकारता येत नाही. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला नरसंहार रशियाने ताबडतोब थांबला पाहिजे. रशियाने युक्रेनविरुद्ध एवढी आक्रमक भूमिका कधीच घेतली नसती. परंतु अमेरिका, ब्रिटन व नाटो देशांनी वेळोवेळी रशियाला उकसविण्याचे काम केले. त्यामुळेच पुतिन युक्रेनविरुद्धची लढाई ही आपल्या स्वाभिमानाची लढाई म्हणून लढत आहे. यासाठी त्यांनी पूर्णपणे कंबर कसली असून, आर-पारचा पवित्रा स्वीकारला आहे. हे तेवढेच सत्य आहे की या लढाईमुळे फायदा कोणालाही नाही.परंतु नुकसान सर्वांनाच भोगावे लागणार आहे. कारण रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. याचा विचार अमेरिका व रशियाने केला पाहिजे. परंतु आता रशिया एकही पाऊल मागे हटायला तयार नाही. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध महाविनाकडे वाटचाल करताना दिसत आहे. अमेरिका हे युद्ध थांबवू शकतो. परंतु तसे कदापि शक्य नाही. कारण अमेरिकेच्या बायोवेपन्स लॅब युक्रेनमध्ये असल्यामुळे युक्रेनवर रशिया कब्जा शक्य नाही.अशा परीस्थितीत हे स्पष्ट होते की, सध्या युक्रेन-रशिया युद्ध नसून, अमेरिका विरुद्ध रशिया असे युद्ध सुरू आहे. परंतु या युद्धात आजच्या परिस्थितीत युक्रेन खंडर बनल्याचे दिसून येते. साडेचार करोड लोकसंख्या असलेला देश आज रक्ताच्या लाथोळ्यात बरबटला आहे. गेल्या 48 दिवसांत युक्रेनच्या सुंदरतेला रशियाने स्मशानभूमीत रूपांतरीत केल्याचे दिसून येते. हा खुनी संघर्ष ताबडतोब थांबायला हवा. कारण हे युद्ध अमेरिका-नाटो विरुद्ध रशिया असे सुरू आहे. परंतु निरापराध युक्रेन नागरिकांना, मुलांना, वृद्धांना मृत्यूच्या खाईत लोटले जात आहे ही अत्यंत दु:खद आणि गंभीर बाब आहे हे कोठेतरी थांबायला हवे. माणुसकी या नात्याने जो बायडेन, जेलेन्स्की व पुतिन यांनी एक-एक पाऊल मागे घेऊन युक्रेनमधील खुनी तांडव थांबविला पाहिजे. यातच खरी माणुसकी व महाशक्तीची ताकद दिसून येईल. असेही सांगण्यात येते की रशियन सैन्याकडून युक्रेन नागरिकांचा छळ करण्यात येत आहे. त्यामुळे हे घृणास्पद कृत्य थांबवायचे असेल तर ताबडतोब युद्ध थांबायला हवे.

जगात इतर कोणत्याही देशांत युद्ध होत असेल तर अमेरिका व रशिया मध्यस्थी करून युद्ध थांबवायचे असे अनेकदा आपण पाहिले आहे. परंतु रशिया -युक्रेन युद्ध हे फक्त नावालाच आहे. हे युद्ध खरे पाहिले तर रशिया विरुद्ध नाटो-अमेरिका आहे हे आता सिद्ध झाले आहे. कारण ही लढाई रशिया-युक्रेनपुरती सीमित असती तर 8 ते 15 दिवसांत रशिया व अमेरिकेच्या मध्यस्थीने हे युद्ध संपुष्टात आले असते.परंतु अमेरिकेची नाळ युक्रेनमध्ये गाडली असल्याने रशियाला युक्रेनवर सहज विजय मिळविता येणार नाही. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध आता अमेरिका विरुद्ध रशिया झाल्याचे स्पष्ट दिसून येते. या युद्धात दोन्ही बलाढ्य देश आमने-सामने असल्याने यात युनोने ताबडतोब हस्तक्षेप करून युद्ध थांबविले पाहिजे. कारण या युद्धात मानवीय व वित्तीय हानी युक्रेनची मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि युक्रेन आजच्या परिस्थितीत 100 वर्षे मागे गेल्याचे दिसून येते.

युक्रेनला मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम अमेरिका व नाटोने केले तर रशियाने निरापराध्यांचा बळी घेऊन क्रूर कृत्य करून मानवजातीला कलंकित केले. रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी युनो, जागतिक न्यायालय, भारत, इस्त्राइलसह जगातील संपूर्ण देशांनी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. कारण हे युद्ध 24 फेब्रुवारी 2022 ला सुरू झाले व या युद्धात अत्याधुनिक मिसाईल, दारूगोळा, हवाईहल्ले, क्लस्टर बॉम्ब अशा घातक बॉम्बचा सुद्धा उपयोग आतापर्यंत करण्यात आला व आताही होत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.असेही सांगण्यात येते की, रशिया पुढे चालून युक्रेनवर घातक प्रहार करू शकतो. यामुळे युक्रेनचे नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत. युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती पाहता अंगावर शहारे येतात. अशा प्रकारच्या भयानक यातना व त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.म्हणजेच युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती अत्यंत भयावह व चिंताजनक झाली आहे. मानवजातीचे व माणुसकीचे पालन करून संवादाच्या माध्यमातून रशियाने हे युद्ध ताबडतोब थांबवायला पाहिजे.यातच बलाढ्य देशांची मानुसकी
जगापुढे दिसून
येईल.

हे ही वाचा :

Devyani Sonar

View Comments

  • गावकरी या नावलौकिक मिळवलेल्या दैनिक वृत्त पत्राने डिजिटल क्षेत्रात सहभाग घेऊन वायूवेगाने News देण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे करिता मा.संपादक साहेब यांचे व या पोर्टल वर काम करणारे सहकारी टीम यांचे मनापासून धन्यवाद.

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

1 day ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

1 day ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago