संपादकीय

एसटी अधिकारी निलंबन योग्य का अयोग्य?

– अशोक थोरात
राज्य परिवहन महामंडळात नाशिक विभागातील सर्वच प्रमुख 11 अधिकार्‍यांचे निलंबन हा महामंडळातील इतिहासातील सर्वांत मोठा भूकंप, का फुसका बार हे हळूहळू समोर येईल. पण आधीच घरघर लागलेल्या या खात्यात थेट मोठ्या संख्येचे निलंबन हा विषय मात्र डोके सुन्न करणारा आहे. आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवराव कुसेकर प्रशासकीय अधिकारी आहेत. या निलंबनाची त्यांना माहिती देऊन निलंबन केले का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे डॉ. कुसेकरांना महामंडळाचा अभ्यास आहे का, असेही बोलणे सुरू झाले आहे. खरेतर एसटी महामंडळातील अधिकारी अनेक अडचणींचा सामना करून बसची चाके फिरवत आहेत. या महामंडळाच्या तोट्याबाबत जनतेत अनेक संशय व्यक्त होत आहेत. म्हणजे खूप गैरव्यवहार होतो, असा समज आहे. आता निलंबनाची कारणे तकलादू आहेत. थेट पैसे खाण्याचा आरोप नाही, तर हलगर्जीपणा, बर्‍यापैकी दुर्लक्ष म्हणून नाशिक विभाग तोट्यात गेला, हे कारण निलंंबनास योग्य वाटत नाही. शो कॉज नोटीस, सर्व प्रकरणाची चौकशी व सर्व समोर आल्यावर अंतिम निर्णय निलंबन, पण तसे न होता निलंबित अधिकार्‍यांना बाजू मांडण्याची संधीच न देता थेट निलंबन करणे योग्य वाटत नाही. खरेतर एसटी महामंडळात अनेकांची मक्तेदारी झाली आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणे, बदल्या न होणे यामुळे थोडी बेशिस्त व दादागिरी वाढते. महामंडळात चालक-वाहक हा महत्त्वाचा घटक, पण यातील किती सौजन्याने वागतात? प्रवाशांशी अरेरावीने वागतात व अशा कर्मचार्‍यांकडून डेपो स्तरावर ते जिल्हास्तरावर काम करून घेणे जिकिरीचे आहे. आपली रोजीरोटी किती कर्मचारी समजतात, हे बघायची वेळ आली आहे. राज्यातील बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बंद करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
धुळे-शहादा बसमध्ये प्रवास करताना बस पूर्णपणे गळत होती. अनेक प्रवासी ओलेचिंब झाले. वाहकाला सांगितले, तर तोदेखील उद्धटपणे उत्तरे देत होता. वरिष्ठ अधिकारी नितीन मैद यांना बसमधूनच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सर्व कळविले. व्हिडिओ, फोटो पाठवले. धुळे विभाग नियंत्रकांना मेल करून सर्व पाठवले, पण दहा दिवसांत काहीच झाले नाही. अशा लोकांकडून काम करून चाके फिरवणे सोपे नाही. नादुरुस्त बसेसची कमतरता, स्पेअर पार्टची टंचाई अशा अवस्थेत अधिकारी काम करतात, हे निलंबनाआधी समजून घेतले नाही, हे नक्की! डिझेल नसल्याने बर्‍याच फेर्‍या ऐनवेळी रद्द कराव्या लागतात. देखभाल-दुरुस्तीबाबत जबाबदारीने काम होते का, याचा तपास केला पाहिजे होता.
अधिकारीसुद्धा प्रवाशांच्या तक्रारीकडे दहा वर्षांपासून लक्ष देत नाहीत. समज दिली आहे, दिलगिरी व्यक्त करतो, असे पत्र पाठवतात व विषय संपवतात. याचे कारण वादात पडायचेच नाही, असे कातडी बचाव धोरण वापरले जाते. निलंबित 11 अधिकार्‍यांचा जुना कारभार कसा होता व आताच असे काय चुकले, हेही तपासून वेगळा विचार करणे गरजेचे आहे.कदाचित सिंहस्थ कुंभमेळ्यात महामंडळाच्या नाशिक विभागाचा कारभार वाढणार आहे. अतिरिक्त बसेस वाढतील.
अशा वेळी मर्जीतील टीम बसवायचा तर हेतू नसेल, असाही संशय येतो. नफा कमी झाला, प्रवासी कमी झाले याला व्यक्ती नव्हे, तर व्यवस्था जबाबदार असते. अशा गळक्या बसेस व उद्धट कर्मचारी यांच्यामुळे प्रवासी बसपासून दूर जातात, याचा विचार कधी होणार आहे? खरेतर अर्धे चालक-वाहक सौजन्याने वागतात. एसटीला रोजीरोटी समजतात म्हणून सर्वच वाईट नाहीत, पण अर्धे आहेत. त्यांना समजवा. वळण लावा, हे महत्त्वाचे आहे.

Why suspension of ST officers is right or wrong?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

24 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

24 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

24 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago