नाशिक

कळवण आठवडा बाजारात रानभाज्यांचा जागर

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रकल्प अधिकार्‍यांची उपस्थिती

सुरगाणा : प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे कळवण येथील आठवडा बाजारात भव्य पारंपरिक रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणार्‍या पौष्टिक रानभाज्यांचे महत्त्व पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कळवणच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला. कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा फवारणीचा वापर न करता उगवणार्‍या या रानभाज्या 100 टक्के सेंद्रिय व रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्‍या असतात. महोत्सवात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले व उपस्थितांना त्यांच्या गुणधर्मांची माहिती दिली. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी रानभाज्यांच्या औषधी गुणांची उत्सुकतेने माहिती घेत खरेदी केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक ज्ञानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विविध गुणकारी रानभाज्या
कुर्डू- रक्तवाढ व अशक्तपणा दूर करण्यासाठी गुणकारी. टाकळा (टाहकळा)- त्वचारोग, पोटाचे विकार व बद्धकोष्ठतेवर उपयुक्त.
शेवळ- सांधेदुखीवर आराम व हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर.
भारंगी- सर्दी, खोकला व दम्यावर आयुर्वेदिक औषध म्हणून कार्य करते. कर्टुले- सर्वांत पौष्टिक मानली जाणारी ही भाजी मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Wild vegetable vigil at Kalvan weekly market

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

51 minutes ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

56 minutes ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

1 hour ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

1 hour ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

2 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

2 hours ago