नाशिक

खरातच्या मुस्कटात लगावणार; तृप्ती देसाईंचा संताप

ईशानेश्वर मंदिर, ‘ब्रह्मसदन’ बंगल्याची पाहणी; संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी

सिन्नर : प्रतिनिधी
भोंदूगिरीच्या आड महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या कॅप्टन अशोक खरातविरोधात भूमाता ब्रिगेडच्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला. संधी मिळाल्यास खरातच्या मुस्कटात लगावणार, असा इशाराच देसाई यांनी दिला. मंगळवारी (दि. 24) त्यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे भेट देत ईशानेश्वर मंदिर तसेच मंदिरालगतच्या आलिशान ‘ब्रह्मसदन’ बंगल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून प्रकरणाची माहिती घेतली.

कॅप्टन अशोक खरात बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी मिरगाव येथे भेट देऊन शिवानिका संस्थानमधील ईशानेश्वर मंदिर परिसर तसेच खरातच्या वास्तव्याशी संबंधित ठिकाणांची पाहणी केली. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
खरातचा भक्त असलेल्या एका उद्योजकाने त्याच्यासाठी ‘ब्रह्मसदन’ नावाचे आलिशान फार्महाउस उभारून दिल्याचा आरोप करत त्या उद्योजकाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी देसाई यांनी केली. तसेच ईशानेश्वर मंदिराचे ट्रस्टी आणि अशोक खरातचे कथित जमीन व्यवहारातील एजंट यांचीही चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले.
अशोक खरातने खोटी आश्वासने देऊन काही ट्रस्टींना फसवले असल्यास त्यांनी पुढे येऊन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन देसाई यांनी केले. प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार तसेच काही मंत्रीही खरातचे भक्त होते. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणी तक्रार घेऊन गेले तर प्रकरण दडपले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणातील महत्त्वाचा पेनड्राईव्ह गायब करण्यात काही पोलिस अधिकार्‍यांचा हात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. मंदिराच्या गाभार्‍यातही खरातने काही महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, ईशानेश्वर मंदिराशी स्थानिकांची श्रद्धा जोडलेली असल्याने शासनाने हे मंदिर ताब्यात घेऊन ते ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आपल्यापर्यंत आलेल्या पेनड्राईव्हची माहिती, त्याची अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी घेतलेली दखल, पोलीस महासंचालकांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेली माहिती आणि त्यानंतर खरातवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा घटनाक्रमही त्यांनी उलगडून सांगितला. यावेळी देसाई यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्ते मंगेश शेळके व गोपाळ आव्हाड उपस्थित होते.

खरातच्या टोळीवर मकोका लावा

खरात हा राक्षसी प्रवृत्तीचा माणूस असून, त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणामागे केवळ तो एकटाच नसून इतरही लोक सहभागी असल्याचा आरोप करत त्याच्या टोळीतील सर्वांना अटक करून मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Will put a face on Kharat; Trupti Desai’s anger

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago