राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

आता 14.2 किलोऐवजी सात किलोचा सिलिंडर मिळणार?

गॅसपुरवठ्यावर संकट कायम

नवी दिल्ली :
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या थेट परिणाम आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात होण्याची चिन्हे दिसत आहेत. होर्मूझच्या सामुद्रधुनीतून होणारी गॅस वाहतूक ठप्प झाल्यामुळे देशातील एलपीजी साथ झपाट्याने कमी होत असून, यावर उपाय म्हणून सरकार आणि तेल कंपन्या महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
भारताच्या एकूण एलपीजी गरजांपैकी सुमारे 60 टक्के गॅस आयातीवर अवलंबून आहे. यापैकी जवळपास 90 टक्के पुरवठा आखाती देशांकडून होतो. मात्र. इराणने होर्मूझ सामुद्रधुनी शत्रू राष्ट्रांसाठी बंद केल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. गेल्या आठवड्यात केवळ दोन गॅसवाहू जहाजे भारतात पोहोचली असून ती देशाच्या केवळ एका दिवसाच्या गरजा पूर्ण करू शकतात. याशिवाय भारताचे सहा मोठे टँकर्स पर्शियन गल्फध्ये अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी नवीन पर्यायांचा विचार सुरू केला आहे. उपलब्ध साथ अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरऐवजी 10 किलो किंवा 7 किलो गॅस भरून देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. अशा सिलिंडरवर नवीन वजनाचे स्टिकर्स लावले जातील आणि ग्राहकांकडून त्यानुसारच पैसे आकारले जातील. तसेच दोन सिलिंडरच्या बुकिंगमधील 25 दिवसांवरून 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचादेखील विचार सुरू आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्य अधिकार्‍यांनी सांगितले की, पुरवठा साखळीवर मोठा ताण आहे. गॅसची बचत करणे ही काळाची गरज बनली आहे. तरीदेखील घरगुती पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, या संभाव्य निर्णयामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी वजनाचा सिलिंडर लवकर संपणार असल्याने महिन्याचे गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. दुसरीकडे, एलपीजी वितरकांसमोर तांत्रिक अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. सिलिंडरचे वजन बदलल्यास बॉटलिंग प्लॅन्टमधील यंत्रणा पुन्हा सेट करावी लागेल. कमी गॅस दिल्यामुळे ग्राहकांकडून गैरसमज किंवा तक्रारी वाढण्याची शक्यता वितरकांनी व्यक्त केली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तसेच अल्टिमेटम देत होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी केली आहे. अन्यथा इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्याची भूमिका घेतली आहे.

Will we now get a 7 kg cylinder instead of 14.2 kg?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

2 days ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

2 days ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

2 days ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

2 days ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

2 days ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

2 days ago