नाशिक

मनमाड गांजा प्रकरणात पतीला अडकवल्याचा आरोप महिलेची गृहमंत्र्यांकडे धाव, आंदोलनाचा इशारा

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांजा विक्रीच्या प्रकरणात आपल्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे. या कटातील मुख्य सूत्रधारांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत, पीडित महिलेने थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागितला आहे. कल्पना बाळू भोसले असे या तक्रारदार महिलेचे नाव आहे.
कल्पना भोसले यांचे पती बाळू वामन भोसले यांच्यावर मनमाड पोलिसांत गांजा विक्रीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, सखोल तपासात विकास पोपट शिंदे आणि गोगा सांगळे यांनी बाळू यांना अडकवण्यासाठी गांजा ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांच्या कबुलीजबाबात शहरातील काही राजकीय नेत्यांची नावे समोर आली आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासन मुख्य सूत्रधारांना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय कल्पना भोसले यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या अर्जाच्या प्रती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवण्यात आल्या आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून, राजकीय दबावाचा वापर करत आहेत. प्रशासन आमचे काहीच वाकडे करू शकत नाही, असे दावे ते सोशल मीडियावरून करत आहेत. पोलिसांनी अशा नेत्यांना तत्काळ अटक करावी. ठोस कारवाई न झाल्यास कुटुंबासह लोकशाही मार्गाने आंदोलन करू.
– कल्पना बाळू भोसले, तक्रारदार महिला

Woman appeals to Home Minister, alleging that her husband was implicated in Manmad ganja case, warns of agitation

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

6 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

6 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

7 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

7 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

7 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

7 hours ago