नाशिक

महिलेच्या पोटात ‘बाळ’ नव्हे, तर तब्बल 5.5 किलोची गाठ

सिन्नरमधील पवार जनरल हॉस्पिटलमध्ये 26 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील पवार जनरल हॉस्पिटल येथे नुकतीच एक आगळीवेगळी आणि अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत एका 26 वर्षीय महिलेला नवजीवन मिळाले. गर्भवती असल्याचा समज झालेल्या या महिलेला प्रत्यक्षात पोटात तब्बल साडेपाच किलो वजनाची गाठ असल्याचे उघड झाल्याने
खळबळ उडाली.
सिन्नर शहरातील रहिवासी असलेल्या या महिलेला गेल्या नऊ महिन्यांपासून गर्भधारणा झाल्याचा भास होत होता. मात्र, या कालावधीत एकही सोनोग्राफी तपासणी करण्यात आली नव्हती. शेवटी सोनोग्राफीसाठी गेल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले, ती गर्भवती नसून, तिच्या पोटात मोठी गाठ होती.
त्यानंतर तातडीने तिला पवार जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुशील पवार यांनी आवश्यक तपासण्या करून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल स्वरूपाची होती, कारण गाठ पोटाच्या स्नायूमध्ये असून, ती मूत्राशय, गर्भाशय आणि आतड्यांना चिकटलेली होती.
डॉ. सुशील पवार यांनी डॉ. निर्मला पवार यांच्या सहकार्याने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेसाठी हॉस्पिटलचे संचालक डॉ. जी. एल. पवार यांचे मार्गदर्शन तसेच भूलतज्ज्ञ डॉ. संजय वलवे यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर जनरल सर्जन डॉ. प्रशांत मुठाळ यांनी पोटाच्या स्नायूंचे पुढील उपचार केले.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे संबंधित महिलेला मोठा दिलासा मिळाला असून, डॉक्टरांच्या कौशल्यामुळे एक गंभीर धोका टळला आहे. स्थानिक स्तरावर या घटनेची मोठी चर्चा होत आहे.

Woman’s stomach not filled with ‘baby’, but with a 5.5 kg lump

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago