ठेकेदारांचा मनमानी कारभार उघड
मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील गोंदे ते पिंप्रीदरम्यान सुरू असलेल्या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी मुकणे धरणाखालील उंडओहोळ नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी बेकायदेशीररीत्या उपसले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या पाणी उपशासाठी नाशिक पाटबंधारे विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचे मुकणे धरण शाखेचे अभियंता आर. एच. भोये यांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान महामार्गलगतच्या पुलानजीक एका कंपनीजवळ नदीपात्रात थेट पाइप टाकून पाणी उचलले जात असल्याचे आढळून आले. या पाण्याची टँकरद्वारे वाहतूक करून ते महामार्गाच्या बांधकामासाठी वापरले जात असल्याचे छायाचित्रांमधून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ नियमभंग नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा नमुना असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, एकीकडे धरणग्रस्त शेतकर्यांकडून पाणीपट्टी आकारली जाते, तर दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांसाठी काम करणार्या ठेकेदारांकडून विनापरवाना पाणी उपसा केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
“नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात संबंधित विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही पुढे येत असून, ठेकेदार आणि अधिकार्यांमध्ये संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर परवानगीच नाही, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा कसा सुरू आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे; अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात
आला आहे.
Illegal water extraction from Mukane riverbed
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…