| राज्य महिला आयोगाचा पुढाकार पुणे प्रतिनिधी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्यात महिला वारकऱ्यांची संझ्याही मोठी आहे, दिंडीत महिला वारकऱ्यांना पुरेशा सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चा क ण कर यांनी पुढाकार घेत ला आहे, महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. त्यामुळे वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना खालीलप्रमाणे काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत महिला आयोगाची आग्रही भूमिका आहे. या सुविधा पुरवा १. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी. २. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे. ३. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. ४. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत. या सुविधा महिला वारक-यांना उपलब्ध करून दिल्यास, पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु होण्यास मदत होईल. याबाबतीत पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत निर्देश देण्यात आलेले आहेत. हे ही वाचा :
| |
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…