नाशिक

मातीचे बैल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात

लासलगाव : वार्ताहर
शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर लासलगावसह वेळापूर परिसरातील कुंभार समाजबांधवांची लगबग वाढली आहे. मातीपासून आकर्षक बैलजोड्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने तयार होणार्‍या या मातीच्या बैलांना पोळ्यानिमित्त ग्रामीण भागात मोठी मागणी असते.
वेळापूर येथील कुंभार मिन्नात उत्तम भागवत व त्यांच्या परिवारातील सदस्य गेल्या काही दिवसांपासून मातीची निवड, माती मळणे, बैलांचे साचे तयार करणे, त्यांना आकार देणे, वाळवणे तसेच रंगकाम करण्याच्या कामात व्यस्त आहेत. बैलांना आकर्षक रंग देऊन त्यावर विविध नक्षीकाम केले जात आहे. सजावटीसाठी रंगीबेरंगी साहित्याचाही वापर केला जात आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करणार्‍या या बैलजोड्या बाजारात विक्रीसाठी सज्ज होत आहेत. येत्या 10 सप्टेंबरला पोळा सण साजरा होणार आहे. पोळा सणाच्या दिवशी शेतकरी बैलांची पूजा करून त्यांना सजवतात. मातीच्या बैलांचीही विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षी पोळ्याच्या काही दिवस आधी कुंभार समाज बांधवांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळते. शहरीसह ग्रामीण भागात मातीच्या बैलांचे पारंपरिक महत्त्व आजही कायम आहे. या व्यवसायातून कारागिरांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक कलेचे जतनही होतेे.

मातीपासून बैल तयार करण्याची कला ही कुंभार समाजाची पारंपरिक ओळख आहे. या पारंपरिक कलेचे जतन आजही आमच्या कुटुंबाकडून होत आहे. मात्र, वाढती महागाई, कच्च्या मालाचा खर्च आणि बदलत्या बाजारपेठेमुळे या व्यवसायासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत.
– मिन्नात भागवत, वेळापूर

Work on making clay bulls is in the final stage.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

5 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

5 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

5 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

5 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

6 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

6 hours ago