नाशिक

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाला वेग

पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणीला सुरुवात; विरोध डावलून कार्यवाही

मनमाड ः प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणार्‍या व गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. सोमवारी (दि. 23) मनमाड येथील गर्डरशॉप परिसरात रेल्वेलाइनलगत असलेल्या वसाहतींमधील घरांचे आणि जमिनीचे मोजमाप करण्यात आले. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही कडक पोलीस बंदोबस्तात भूमी अभिलेख विभागाने ही प्रक्रिया पार पाडली. विशेष म्हणजे, काही नागरिक मोजणीसाठी तयार होते, तर काही विरोधात. तरीही प्रशासनाने सोमवारी ही मोजणी केली.

सविस्तर माहिती अशी की, मनमाड- इंदूर रेल्वे हा बहुप्रतीक्षित रेल्वे प्रकल्प सध्या गतिमान झाला आहे. यासाठी मनमाड शहरातील गर्डरशॉप वसाहतीत असलेले घरे खाली करून ही जागा अधिग्रहित करण्यात येत आहे. यापूर्वी दोन वेळा रेल्वे प्रशासन आणि भूमी अभिलेख विभागाचे पथक मोजणीसाठी आले होते. मात्र, स्थानिक रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत मोजणीचे काम रोखून धरले होते.
प्रशासनाने सोमवारी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. नागरिकांनी पुन्हा एकदा विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांना बाजूला करून मोजणी प्रक्रियेला संरक्षण दिले.
केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी लागणारी सर्व जागा रेल्वे घेईलच, यात तीळमात्र शंका नाही. भविष्यात या प्रकल्पग्रस्त नागरिकांना या जागेचा मोबदलादेखील देण्यात येईल.

वसाहतींच्या घरांचे मोजमाप

या कार्यवाहीत सोमवारी (दि. 23) प्रामुख्याने गर्डरशॉप भागातील रेल्वे लाइनजवळ असलेल्या घरांची मोजणी केली. जमीन अधिग्रहणात किती घरे व क्षेत्र बाधित होणार आहे, याचे निश्चितीकरण आता या मोजणीनंतर होईल. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता या रेल्वेमार्गाचे काम प्रत्यक्ष जमिनीवर सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

कोणत्याही राज्य किंवा केंद्राच्या प्रकल्पात जर भूमी अधिग्रहण केले तर त्यांना मोबदला देण्यात येतोच. मात्र, अनेक ठिकाणी संबंधित प्रकल्पग्रस्त परिवारातील एकाला त्या प्रकल्पात नोकरीत सामावून घेण्यात येते. आमचेही घर जाणार आहे. केंद्र सरकारने आमच्या परिवारातील एका सदस्याला रेल्वेत प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीत सामावून घ्यावे, अशी आमची मागणी आहे.
– रामदास पगारे, स्थानिक रहिवासी

Work on Manmad-Indore railway line accelerates

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago