नाशिक

शहरात जागतिक दर्जाचे रामायण थीम पार्क

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात रामायणकालीन वारशाला आधुनिक तंत्रज्ञान, थीम आधारित वास्तुकला, मनोरंजन, संस्कृती आणि अध्यात्म यांच्याशी जोडणारे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रामायण थीम पार्क विकसित करण्यासाठी महासभेवर हा प्रस्ताव सादर केला आहे.
शहराचा पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा जगासमोर अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी नाशिकमध्ये भव्य व जागतिक दर्जाचे रामायण थीम पार्क उभारले जाणार आहे. आडगाव येथील सर्व्हे क्र. 772 मधील महापालिकेच्या राखीव जमिनीवर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर) तत्त्वावर राबविला जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न पडता शहराला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र मिळणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. नाशिकमध्ये येणार्‍या लाखो भाविक आणि पर्यटकांना केवळ काही वेळेसाठी मर्यादित न ठेवता, त्यांचा नाशिकमधील मुक्काम वाढवणे आणि कौटुंबिक पर्यटनाला चालना देणे, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पामुळे नाशिकमधील हॉटेल्स, ट्रॅव्हल्स, वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांना मोठी उभारी मिळेल. तसेच बांधकाम आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतरच्या टप्प्यात सुरक्षा, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि सांस्कृतिक क्षेत्रात हजारो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

पार्कची वैशिष्टये अशी
या थीम पार्कमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर केला जाणार आहे. रामायणातील विविध प्रसंग जसे की, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. यासाठी 360 अंश इमर्सिव्ह डोम, रॉयल अ‍ॅम्फीथिएटर, मोक्ष घाट, श्रीराम मंदिराची प्रतिकृती, लॅण्डस्कॅप स्पिरिच्युअल स्पेसेस, फूड कोर्ट यांसह इतर पूरक पर्यटन सुविधांचा समावेश केला जाणार आहे. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आणि सोयीसाठी या पार्कमध्ये खरेदीसाठी विशेष दुकाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

World-class Ramayana theme park in the city

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago