नाशिक

नाशिकची ऐतिहासिक ओळख जाणार सातासमुद्रापार

महापालिका गणेशवाडीत उभारणार डिजिटल केंद्र

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाने पंचवटी विभागातील गणेशवाडी मार्केट येथील सुमारे 7,400 चौरसमीटर जागेवर अत्याधुनिक डिजिटल अनुभव केंद्र (डिजिटल एक्सपेरियंन्स सेंटर) विकसित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याद्वारे शहराची सांस्कृतिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक ओळख अधिक प्रभावीपणे सातासमुद्रापार पर्यटकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
डिजिटल अनुभव केंद्रात नाशिकचा पौराणिक इतिहास, संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व एकाच छताखाली असेल. प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पर्यटकांना रंजक व अत्याधुनिक अनुभव, विद्यमान तीर्थक्षेत्रे आणि वारसास्थळांना पूरक ठरेल असे नवे प्रमुख आकर्षण, भाविक, पर्यटक, विद्यार्थी, संशोधक व स्थानिक रहिवाशांसाठी वर्षभर खुले राहणारे केंद्र असेल. पर्यटकांचा मुक्काम वाढवून स्थानिक व्यवसाय व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे. खाजगी क्षेत्राचा सहभाग घेऊन आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मिती आणि संचालनामध्ये खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा, त्र्यंबकेश्वर यांसारख्या प्रमुख धार्मिक व वारसा स्थळांमुळे देशच नव्हे, तर जगभरात आध्यात्मिकदृष्टया ओळख आहे. सिंहस्थ कुभमेळ्यात लाखो भाविक दाखल होतात.
दरम्यान, नाशिकची पौराणिक पार्श्वभूमी, इतिहास आणि महाराष्ट्रातील योगदान यांची एकत्रित माहिती देणार्‍या एकात्मिक व्यासपीठाची उणीव भासत होती. त्यानुसार डिजिटल अनुभव केंद्र उभारून प्रगत डिजिटल तंत्रज्ञान, परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) प्रदर्शने, आभासी अनुभव, प्रोजेक्शन मॅपिंग आणि दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून नाशिकची यशोगाथा रंजक पद्धतीने मांडली जाणार आहे.
महापालिकेच्या मालमत्ता मुद्रीकरण समितीने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. डिझाइन बिल्ड फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्त्वावर प्रकल्प सल्लागार नेमणूक व पुढील प्रक्रियेसाठी महासभेची मान्यता मागण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींचा विरोध?
गणेशवाडीतील भाजी मार्केटमध्ये विक्रेते बसत नसल्याने ते तसेच पडून होते; परंतु फुलबाजार येथे दररोज भरत असल्याचे चित्र आहे. भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा म्हणून या मार्केटची व्यवस्था केली होती. मात्र, आता याठिकाणी डिजिटल केंद्र उभारले जाणार आहे. स्थानिक विक्रेत्यांसह लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या या निर्णयास विरोध करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Nashik’s historical identity to reach across the seven seas.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago