खोडाळ्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.
मोखाडा : नामदेव ठोमरे
9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात साजरा होतो. आदिवासी बांधवांची जीवनशैली व त्यांची ओळख दर्शवणारा पारंपरिक पेहराव वेशभूषा संस्कृतीचा वेगळेपणा जपणारा उत्सव तसेच निसर्गावर अतुल्य प्रेम जल जंगल जमिनीवरील निष्ठा मानवतेवरील प्रेम श्रद्धा निष्ठेने हा उत्सव साजरा होतो याच निष्ठेने खोडाळा येथे मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधवांनी एकजुटीचे दर्शन दाखवले. यावेळी खोडाळा बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली डीजे संबळ तुतारी तारपा वाद्यावर पारंपारिक नृत्य करत संबंध परिसरात जय आदिवासी जय जोहार घोषणांचा जयजयकर ऐकवयास मिळाला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या वीर आदिवासी क्रांतिकारांच्या प्रतिमेला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले याप्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये.माजी आमदार सुनील भुसारा. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम. जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले. जिल्हा परिषद सदस्य हबीब भाई शेख. मोखाडा शहराचे नगराध्यक्ष अमोल पाटील अशोक पाटील अनेक लोकप्रतिनिधी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे क्रांती करांचे विचार आदर्श व्यक्तींचा सन्मान नवनियुक्त कर्मचारी सेवामुक्त कर्मचारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयातील हॉलमध्ये घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकरांच्या बलिदानाचे मोल आपल्या विचाराद्वारे उपस्थितांसमोर मांडले यावेळी आयोजक आदिवासी समन्वय समिती सर्व सदस्य आदिवासी बांधव महिला उपस्थित होत्या.
बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…
मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…
मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…
दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्या सोमवारच्या ब्रह्मगिरी…
खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस आदिवासी कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश महेश शिरोरे खामखेडा:…