– वासवदत्ता अग्निहोत्री
पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे सर्वांचे आपापले कयास असतात. पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल अनेक संशोधक, विचारवंत लोकांनी वेगवेगळे सिद्धांत दिले आहेत. आपण आपल्या शालेय शिक्षणात हे अभ्यासले आहेत. पण आता भारतीय दर्शना सोबत इतर देशांच्या दर्शनाचा ही अभ्यास केल्यास आपण आणिक परिष्कृत होतो हे कळाल्यानंतर विद्यार्थी नवीन सिद्धांत, नवीन संशोधित दर्शन किंवा प्राचीन काळापासून, इतर देशातील तत्वज्ञानी आणि त्यांची संशोधनं याचाही अभ्यास करत आहेत.
एडम आणि ईवची प्राचीन गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. जेव्हा दोन परस्परविरोधी लोक एकमेकांसोबत जोडल्या गेले तेव्हाच नवनिर्माण, सृजन हे संभवले. जेव्हा कुठलाही नवीन निर्माण होतो तो दोन किंवा अधिक वस्तूंच्या जोडल्या गेल्या ने होतो. फक्त भारतीय संस्कृतीच नव्हे, तर संपूर्ण जगातील विद्वान, शोधकार्यात व्यस्त असतात. फार पूर्वीपासून अनेक गोष्टींचा शोध लावताना तिसरीच नवी गोष्ट सापडते किंवा संशोधित होते, असे अनेकवार होते.
परस्परांना पूरक असलेल्या पण परस्परविरोधी असणार्या दोन शक्ती किंवा ऊर्जावान असणार्या वस्तूंना एक शब्दप्रयोग आहे यिन-यांग. ’रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल ’ जिथे अंधार संपतो तिथून उजेड सुरू होतो आणि जिथे उजेड संपतो, ती जागा अंधार व्यापतो. ही एक सूक्ष्म सीमारेषा आहे.
ईसापूर्व नवव्या शतकातील हा चीनी सांस्कृतित लागलेला शोध सुमारे 3000 वर्षांपूर्वी लागला होता. या चिनी दर्शनाने कन्फ्यूशियस सारख्या विचारवंताला, तत्त्वज्ञानीला ही प्रभावित केले होते. हे एका चिन्हाद्वारे दर्शविण्यात आले होते. यात काळा आणि पांढरा अशा दोन रंगांचा समावेश आहे. पांढरा रंग प्रकाश, सूर्य आणि उष्णता दर्शवतो आणि लहान काळा भाग अंधार, रात्र आणि शीतलता. दोन्ही भाग स्वतंत्र वाटले तरी एकमेकांवर अवलंबून आहेत. प्रत्येक शक्तीमध्ये तिच्या विरोधाचे बीज असते. अंधारात प्रकाशाचा अंश आणि प्रकाशात अंधार. या दोन्ही शक्तींच्या संतुलनामुळे, पृथ्वीचा, सृष्टीचा समतोल, संतुलन टिकून राहते.
एक सामान्य उदाहरण आहे, उंचावरून खाली कोसळणारा धबधबा ’यिन ’आहे. पण जेव्हा तो खाली आदळतो तो ’यांग ’होतो, कठोरतम, मारक आणि घातक. कोमल आणि कठोर. दिवस आणि रात्र, चंद्र-सूर्य, अंधार आणि प्रकाश, जे जे परस्परविरोधी आहेत ते ’यिन-यांग ’आहेत. ते विपरित अर्थी, विपरित लिंगी किंवा परस्पर अगदीच विरोधी असतात. त्यामुळेच ते यिन-यांग असतात. आपल्या आजूबाजूला द्वैत आहे, म्हणजेच प्रत्येक गोष्टीचे दोन पक्ष उपस्थित आहेत. कुठल्याही एका पक्षाला दुसर्यापासून वेगळे करता येणार नाही.
दोन्हींत एकमेकांचा अंश आहे, किंबहुना दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संतुलन हा प्रत्येकाचा मूलभूत स्वभाव असतो नव्हे, ते साधून राहणे हे फार गरजेचे असते. अंधारात आपण प्रकाशाची एक झोत पाहून हुरळून जातो, पण त्याचबरोबर सूर्याची प्रखरता आपल्याला एका अंधारात, सावलीत,थंडाव्यात जाण्यास प्रवृत्त करते.
आपण नकळत संतुलन ठेवतो. हा आपला स्वभावच आहे. यिन-यांग हे संतुलनाचे दर्शन आहे. आज समाजात याच संतुलनाची गरज आहे. जसे हिंस्र पशूदेखील पोट भरल्यावर कुठल्याही जीवाची शिकार करत नाहीत, तसेच माणसाने ही आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर, वस्तूंचा संचय करण्याचा मोह आवरला पाहिजे.
मोठेमोठे व्यवसायी, अभिनेते, खेळाडू, राजकीय नेते, आमदार खासदार यांंना आपले ’पोट ’भरल्याची जाणीव कधीतरी करावी, जेणेकरून समाजात गरीब श्रीमंत यात संतुलन राहील.
भारतात एक अतिशय श्रीमंत आणि एक अगदीच गरीब हे असंतुलन सर्वदूर बघण्यात येते. हे यिन-यांगच्या दर्शनाविरुद्ध आहे आणि घातक ही आहे. जिथे सृष्टीने, निसर्गाने संतुलित राहणे शिकवले आहे तिथे आपण त्याच्या विरोधात कितीक टिकणार आहोत… लक्षात घेण्याची गरज आहे.
Yin-Yang
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…
ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले नाशिक : प्रतिनिधी दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या…