राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

तरुणांनी राजकारणाकडे ‘मिशन’ म्हणून पाहावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला ‘जेन-झी’शी संवाद

नागपूर/मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर ’मंथन फॉर युवा’ या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून ’जेन-झी’ पिढीतील तरुणांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. विशेष म्हणजे, या सोहळ्यात तब्बल 4,100 तरुण-तरुणींनी एकत्रितपणे ढोल-ताशा वादनाचा नवा विक्रम रचला. या मनमोकळ्या संवादात मुख्यमंत्र्यांनी तरुणांना राजकारणाकडे एक व्यवसाय म्हणून न पाहता, एक ’मिशन’ म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन दिला. तसेच, तरुणांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि स्टार्टअप्सना राज्य सरकारकडून पूर्णपणे पाठबळ व प्रोत्साहन दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तरुणांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीस यांनी आपला नगरसेवक ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास उलगडला. जीवनात आणि करिअरमध्ये येणारा ताणतणाव व ‘दबाव’ कसा हाताळावा, याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात पहिल्यांदा तिरंगा फडकवतानाचा आपला एक जुना किस्साही तरुणांसोबत शेअर केला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. नागपुरातील तरुणांचा हा कार्यक्रम पूर्णपणे उत्स्फूर्त होता, इथे लोकांना आणले गेले नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, या उपक्रमात आतापर्यंत तब्बल दीड लाख तरुणांनी सहभाग नोंदवल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दीपकेंचे फोटो कार्यालयात लावा!

शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या या ’जेन-झी’ संवादावर सडकून टीका केली आहे. भाजपने नुकत्याच पुण्यात झालेल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ’पेड इव्हेंट’ आणि ’पैसे की गूंज’ म्हटले होते, याची आठवण करून देत, मग आजचा तुमचा कार्यक्रम काय होता? असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी अभिजित दीपके यांचा फोटो आपल्या कार्यालयात लावायला हवा, कारण त्यांच्यासारख्या तरुणांच्या आंदोलनांमुळेच भाजपला ’जेन -झी’ अस्तित्वात असल्याची जाणीव झाली, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

Young people should view politics as a ‘mission’.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

3 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago