राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

जरांगे यांचे वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात

फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द; भाजपा नेते संतापले

मुंबई :
मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी आवाहन आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीवजा इशारा देताना त्यांच्या आईचा उल्लेख करत जरांगेंनी अपशब्दांचा वापर केला. जरांगेंच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटले आहे.
आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करू शकते. पण आंदोलनाच्या निमित्ताने कोणाच्याही मातेला उद्देशून अपशब्द वापरणे योग्य नाही; अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड या सर्वांनीच जरांगेंच्या आक्षेपार्ह भाषेचा जाहीर निषेध केला. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शक्य तेवढ्या तरतुदी केल्या आहेत. तरीही वेगळ्या मागण्यांसाठी मराठा समाज जरांगेंच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्यास त्याला सरकारचा विरोध नाही. पण आंदोलनाच्या नावाखाली कोणाच्याही मातेला उद्देशून अपशब्द वापरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणार्‍यांमध्ये 29 नव्या जातींचा समावेश केला आहे. पण मराठ्यांच्यावतीने केलेल्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत, असा आरोप केला. आता मागण्या मान्य होत असतील तर मुंबईत येणार नाही. पण आरक्षण देत नसाल तर सरकार उलथवून टाकेन, अशी धमकी जरांगेंनी दिली.

शब्द माघारी घेतो : जरांगे
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. पण मग देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे, असेही जरांगे म्हणाले.

वळवळणारी जीभ हातात देऊ : नितेश राणे

जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्याही आई-बहिणींचा आदर केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी. मात्र, फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

आपल्या मर्यादेत राहा : प्रवीण दरेकर

फडणवीस यांच्या आईविषयी अपमानास्पद भाष्य केल्याच्या आरोपानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिला. प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट सुसंस्कृत आहे, मात्र देवेंद्रजींची पैदास काढणे ही विकृती आहे. आम्ही त्यांना जरांगे म्हणायचो, दादा म्हणायचो. मात्र जरांगे कसली औलाद आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. मराठा समाजाचे नेते आपणच आहोत या आविर्भावात राहायचे. आपण आपल्या मर्यादेत राहा. अन्यथा आम्ही तुला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी जरांगे यांना दिला आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

12 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

12 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago