दप्तर घ्या; बकर्‍या द्या!

दप्तर घ्या; बकर्‍या द्या
काळुस्तेच्या 45 विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेसमोर बोकड आंदोलन

नाशिक : प्रतिनिधी
भाम धरणामुळे बाधित झालेल्या दरेवाडीच्या 45 विद्यार्थ्यांनी काल जिल्हा परिषदेसमोर बंद असलेली शाळा सुरू करण्यासाठी बोकड आंदोलन केले. दप्तर घ्या, बोकड द्या अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे आवार दणाणून सोडले. यावेळी काळुस्ते येतील सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली 2 बोकडांसह 25 पालकांनी आंदोलनाला हजेरी लावली.
इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे बाधित झालेल्या दरेवाडीच्या 40 कुटूंबातील 45 विद्यार्त्यांची काळुस्ते येतील पहिली ते पाचवी शाळा जिल्हा परिषद प्रातमिक शिक्षण विभागाने महिन्याभरापासून बंद केल्याने काळुस्ते येतील सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या 45 विद्यार्त्यांनी दप्तर घ्या, बकर्‍या द्या या मागणीसह काल जिल्हा परिषदेच्या गेटवर 2 बोकडांसह 20 ते 25 पालकाना सोबत घेउन बोकड आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्त्याकडून शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शिक्षणाची लावली पाटी, आम्हाला लावले ढोरांच्या पाठी आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर कनोज यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात दरेवाडी येथील तात्काळ शाळा सुरू करावी , मुलांना एक महिन्यापासून शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍या गटशिक्षणाधिकारी, अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यावर कारवाई करावी, नवीन शाळेला तात्काळ मंजुरी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
45 विद्यार्थ्यांपेकी इयत्ता पहिलीमध्ये 7, इयत्ता दुसरीमध्ये 10, इयत्ता तिसरीमध्ये दहा, इयत्ता चौथीमध्ये 9, इ. 5वीमध्ये 7 असे एकुण 45 विद्यार्थी निवारा शेडमधील शाळेत शिकत आहेत. आंदोलनात सीताराम गांवडा, गणपत गावंडा, साईनाथ गावंडा, सोमनाथ आगिवले, बाळू गावंडे, काळू गांवडा, लक्ष्मण गावंडे, लहू गावंडे, कृष्णा गावंडे, आनंद आगीवले, राजेंद्र मेंगाळ, गोविंद गावंडे यशोदा बाई गावंडे, नथु सावंत, मथुरा भगत हजर होते.

निवारा शेडमध्ये शिकत असलेल्या 45 विद्यार्त्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात शाळा सुरु होती. या मुलांचे मुळ दरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याने निवारा शेडमधील शाळेसाठी 1 शिक्षक तात्पुरत्या स्वरुपात पाठविण्यात येत होता. निवारा शेडमधील तात्पुरत्या शेडमध्ये सुरु असलेली शाळा बंद करुन मुळ दरेगाव किंवा काळुस्ते येथील हायस्कुलमध्ये मुलांना वर्ग करण्याचे प्रयोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. जेणेकरुन विद्यार्त्याना अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देता येईल.
– निलेश पाटील, गट शिक्षणाधिकारी, इगतपुरी

सोमवार दि. 3 ऑगस्टरोजी शाळा युनिट बंद करुन मुलांचे शिक्षणाचे भविष्य उध्वस्त करण्याचा प्रशासनाने प्रयत्न सुरू केला असून या ठिकाणी भरणारी शाळा तात्काळ गटशिक्षणाधिकारी इगतपुरी यांनी दिनांक 13 सप्टेंबर पासून बंद केली आहे. विद्यार्त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्का पासून वंचित ठेवले आहे म्हणून आज विद्यार्थ्यांना घेऊन दप्तर घ्या बकर्‍या द्या या मागणीसह आम्ही जिल्हा परिषदेच्या गेटवर बोकड आंदोलन करीत आहोत.
– भगवान मधे, सामाजिक कार्यकर्ता, काळुस्ते

निवारा शेडमधील शाळा शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत सुरु ठेवण्यात येत आहे. यासाठी मुळ दरेगाव येतील 1 शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. निवारा शेड येथे कायमस्वरुपी शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव आल्यास तो शासनाला पाठविण्यात येईल. शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
– भास्कर कनोज, शिक्षणाधिकारी (प्रातमिक), जिल्हा परिषद, नाशिक

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago