अनिल देशमुखांच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका फेटाळली
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्रीआणि आमदार अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधात ईडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर केली होता. मात्र ईडीने जामीन विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीच्या प्रकरणात हायकोर्टानं जामीन दिल्याच्या निर्णयात हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अनिल देशमुख यांना सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मात्र जामीन मिळवावा लागेल. तूर्तास अनिल देशमुखांची सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी मात्र 1 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे.
,,,,,,,,Edited by शुभम तांबे,,,,,,,,,,,,,,,
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…