नाशिक

पंचवटीत घरझडतीत तीन लाखांचे 100 ग्रॅम एमडी जप्त; संशयित फरार

सिडको : प्रतिनिधी
पंचवटी परिसरातील वाल्मीकनगर, सैलानी बाबा चौक येथील सुलभ शौचालयाजवळ एका घरावर छापा टाकून अमली पदार्थविरोधी पथकाने तीन लाख रुपयांचे 100 ग्रॅम
मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले. या कारवाईदरम्यान संशयित रवी राजू भालेराव पळून गेला. त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस हवालदार भारत डंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाल्मीकनगर, सैलानी बाबा चौक, वाघाडी, पंचवटी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
रवी राजू भालेराव याच्या घराची झडती घेतली असता पारदर्शक प्लास्टिक पिशवीत फिकट तपकिरी रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आढळून आला.
पथकाने इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर पदार्थाचे वजन केले असता 101 ग्रॅम आढळले. त्यानंतर पिशवीचे वजन वजा केल्यानंतर अमली पदार्थाचे वजन 100 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले.
सहायक केमिकल अ‍ॅनालायझर साक्षी कुर्‍हाडे व सायंटिफिक असिस्टंट यश जुनेजा यांनी पदार्थाची प्राथमिक तपासणी करून तो एमडीसदृश असल्याचे सांगितले. जप्त केलेला अमली पदार्थ मोबाइल फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पॅक करून सीलबंद करण्यात आला. तसेच एमडी ठेवण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर रवी राजू भालेराव फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

100 grams of MD worth ₹3 lakh seized during a house search in Panchavati; suspect absconding.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

17 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

17 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

17 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

18 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

18 hours ago