विखेंच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन; आरक्षणासह विविध मागण्या
नाशिक : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांंकडे शासनाचे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांवर केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी समन्वयक करण गायकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी केली.
येत्या 9 ऑक्टोबरपासून दहा टक्के एसईबीसी आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत असताना सरकारने न्यायालयात कोणती तयारी केली आहे, याची माहिती समाजाला द्यावी आणि आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडावी, अशी मागणी करण्यात आली. दहा टक्के आरक्षणासोबत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवरही सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यातील ईडब्लूएस आरक्षणाच्या लाभाचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. मराठा समाजाला राज्यात अपेक्षित लाभ मिळत नसल्याची भूमिका मांडत शासनाने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीची तातडीने बैठक बोलावून शासनाची स्पष्ट भूमिका समाजासमोर मांडावी, तसेच मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या प्रतिनिधींनाही बैठकीस निमंत्रित करावे, अशी मागणी करण्यात आली. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला प्रत्येकी एक हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 500 विद्यार्थी क्षमतेची सुसज्ज वसतिगृहे उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली.
कोपर्डी प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी शासनाने आवश्यक कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनासाठी नानासाहेब बच्छाव, शिवाजी मोरे, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, शरद तुंगार, सुभाष गायकर, प्रवीण पाटील, विजय खर्जुल, योगेश गांगुर्डे, वैभव दळवी, योगेश पाटील, शुभम महाले, राम निकम, संगीता सूर्यवंशी, सविताताई वाघ, नवनाथ वैराळ, गोरख संत, मधुकर शिंदे, दत्ता हराळे, आबा पाटील, भारत पिंगळे, नाना पालखेडे, नारायण जाधव, प्रताप जाधव, तेजस नवले, प्रफुल गायकवाड, दीपक पवार, दत्ता महाराज पवार, अमोल जगळे, अमोल देवरे, कल्पेश उदावंत आदींसह हजारो समाजबांधव उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत शासनाने कितीही कालावधी घेतला, तरी ज्या मागण्या सरकारच्या अधिकारात आहेत, त्या टेंडर किंवा अनावश्यक प्रशासकीय प्रक्रियेत अडकवून ठेवू नयेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. मराठ्यांना टेंडरच्या प्रक्रियेत अडकवून समाजाचा घात करण्यापेक्षा राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर मराठा समाजाच्या उन्नतीसाठी करावा. आता समाजाला आश्वासने नकोत, तर निर्णय आणि प्रत्यक्ष कृती हवी.
– करण गायकर
‘Jagran-Gondhal’ organized by the Sakal Maratha Kranti Morcha
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…