मनपाकडे 728 मूर्तींचे संकलन
नाशिक : प्रतिनिधी
पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला शुक्रवारी (दि. 18) भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी निरोप दिला. सोमवारी (दि. 14) लाडक्या बाप्पाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना शहरभरात करण्यात आली. त्यानंतर दुसर्याच दिवशी दीड दिवसाच्या बाप्पाचे काही ठिकाणी विसर्जन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी भक्तिभावाने श्रीगणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सहाही विभागांतून महापालिकेकडे एकूण 728 गणेशमूर्तींचे संकलन झाले. यात शाडू मातीचे 74 तर पीओपीच्या 654 मूर्तींचे संकलन
करण्यात आले.
महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी सहाही विभागांत विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य संकलन केंद्रे, मूर्ती संकलन केंद्रे यांसह जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. नदीपात्रातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शहरातील प्रमुख घाटांवर अग्निशमन विभागाचीदेखील सुरक्षाव्यवस्था असणार आहे. नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने गणेश विसर्जनासाठी तयारी केली आहे. याकरिता नैसर्गिक व कृत्रिम अशा एकूण 77 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. याआधी दीड दिवसाचे 172 गणेशमूर्ती संकलित केल्या होत्या. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसांचा व अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते. यात सर्वाधिक अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन सर्वाधिक केले जाते.
विभाग मूर्ती संकलन पीओपी संकलन शाडू माती मूर्ती
पंचवटी 137 120 17
नवीन नाशिक 84 79 5
सातपूर 334 300 34
नाशिक पूर्व 34 30 4
नाशिक पश्चिम 112 100 12
नाशिकरोड 27 25 2
एकूण 728 654 74
Bidding farewell to the five-day Bappa.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…