नाशिक

सप्तशृंगीदेवी शिखरावर 501 किलोचा कळस

निमंत्रणपत्रिकेवरून स्थानिक राजकारण तापले, ट्रस्ट कारभाराविरोधात नाराजी

सप्तशृंगगड : वार्ताहर
श्री सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिराच्या शिखरावर रविवारी (30 ऑगस्ट 2026) दुपारी 12.30 वाजता धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने यांच्या हस्ते 501 किलो वजनाचा पंचधातूचा भव्य कळस वेदोक्त मंत्रोच्चारात यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आला. न्यायालयीन स्थगनादेश आणि प्रशासकीय विलंबाच्या अडथळ्यांनंतर हा सोहळा पार पडल्याने भाविकांची दीर्घ प्रतीक्षा संपली. या सोहळ्यास संत-महंत, अधिकारी व
भाविक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
एकीकडे धार्मिक सोहळा पार पडत असताना, दुसरीकडे देवस्थान ट्रस्टच्या पक्षपाती कारभारामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. गडाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणणारे स्थानिक आमदार नितीन पवार यांचे नाव निमंत्रणपत्रिकेतून जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. या प्रकारामुळे लोकप्रतिनिधी व स्थानिक जनतेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाचे निवेदन सहआयुक्त धर्मदाय यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने तहसीलदारांकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
या सर्व प्रकारास देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे जबाबदार असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांना निवेदने दिली आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अजय दुबे, संदीप बेनके, राजेश गवळी, सुभाष राऊत आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळा निर्विघ्न पार पडला असला तरी ट्रस्टच्या मनमानी कारभारामुळे गडावरील राजकीय वातावरण तापले आहे.

501 kg pinnacle atop the Saptashrungi Devi peak.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago