महाराष्ट्र

2029 पर्यंत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज देणार

‘डीपी’ फेल होण्याचे प्रकारही पूर्णपणे थांबवणार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेत विजेच्या वाढत्या बिलांसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. शासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे महावितरणच्या वीज दरांमध्ये पुढील 5 वर्षांत दरवर्षी 1.2 टक्क्यांनी कपात होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केले. या नव्या धोरणामुळे 2029-30 पर्यंत महाराष्ट्रातील विजेचे दर शेजारील गुजरात राज्यापेक्षाही स्वस्त होतील आणि राज्याची वीज देशात सर्वाधिक स्पर्धात्मक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विजेचा खर्च कमी करण्यासाठीही सरकारने मोठे पाऊल उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात उद्योगांसाठी विजेचा दर 8.32 रुपये प्रति युनिट आहे, जो 2029-30 पर्यंत 7.38 रुपये प्रति युनिटपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सध्या गुजरातमध्ये हा दर 8.43 रुपये आणि तामिळनाडूमध्ये 9.35 रुपये प्रति युनिट आहे; त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील दर या राज्यांच्या तुलनेत कमी असतील.

उद्योगांना दिवसाच्या वीज वापरात 25 टक्के सवलत

सौर ऊर्जेची निर्मिती दिवसा सर्वाधिक होत असल्याने शासनाने सवलतीच्या धोरणात बदल केला आहे. त्यानुसार ’सोलर आवर्स’मध्ये म्हणजेच सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणार्‍या उद्योगांना तब्बल 25 टक्के सवलत दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्या बॅटरी स्टोरेजचा खर्च 2.80 ते 2.90 रुपयांपर्यंत कमी झाला असून, कॅप्टिव्ह सौर ऊर्जा निर्माण करणार्‍यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यांना 24 तास सवलतीच्या दरात वीज मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Will provide electricity cheaper than even Gujarat by 2029.

 

महाराष्ट्रातील विजेचे दर शेजारील गुजरात राज्यापेक्षाही स्वस्त होतील

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago