– सुप्रिया सुरवाडे
अनेकदा आपण ऐकतो, माणूस दूरच्या गोष्टी पाहण्यात रमतो आणि जवळच्या गोष्टी हातातून निघून जातात.. अगदी खरं आहे.पूर्ण जीवनभर आपण फक्त इतरांच अवलोकन करीत असतो इतरांकडे सर्वकिती व्यवस्थित आहे, आपल्याकडे किती कमी आहे, त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त आहे माझ्याकडे का नाही जास्त किंवा इतरांशी आपण सहज तुलना करतो आणि
दुःखी होतो कधीकधी याउल्ट इतरांना कमी पाहून स्वतः कधी खुश होतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असो, मला सांगायचं एक आहे की किती माणूस दुसर्यांच्या आयुष्यात डोकावण्यात व्यस्त झालाय ना सध्या की त्याला स्वतकडे पाहायला पण वेळ नाही. आपल्या हातात भ्रमण ध्वनी म्हणजेच मोबाइल आहे. त्यात आपण स्टेटस पाहतो. त्यावरून इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हेच पाहत असतो कोण कुठे गेले, कोण कोणाचे वाढदिवसाचे स्टेटस टाकतात आणि मग याच विषयांवर पुन्हा चर्चा म्हणजे आपल्याला मिळालेला वेळ इतका सहज आहे की तो आपण कसाही व्यर्थ घालवावा दुर्दैव खरं हेच. आपण स्वतःबद्दल कधी बोललो होतो आठवून बघा तर थोड स्वतमध्ये असलेल्या गुणाच कधी भरभरून कौतुक केल होत आठवून बघाव थोडं. स्वतःच उत्तर मिळून जाईल. आपण कधी स्वतःसाठी वेळ दिलाच नाही, कधी स्वतःला विचारलच नाही. मग कसं मिळेल उत्तर आपल्याला.कधी तरी वेळ काढून निवांत बसावं स्वतःजवळ, बोलावं
स्वतःशीच, नाहीच काही बोलू वाटलं ना तरी निदान शांत बसून स्वतःकडे, स्वतःच्या विचारांकडे एकटक पाहत रहावं, काय हवं आहे आपल्याला आपल्या स्वतःकडून, काय गमावलं आहे, काय मिळवलं आहे, जगण्याची दिशा काय, विचारांचा प्रवाह काय हे सर्व बारकाईने पहावं..पण स्वतःसाठी वेळ काढावा आणि काढलाच पाहिजे. कारण देवाने दिलेलं हे सुंदर आयुष्य खूप विशेष अपल्याजवळ देऊन पाठवलेलं आहे. स्वतःजवळ काय आहे हे जर समजलं नाही तर व्यर्थच झालं सर्व जीवन.म्हणून जवळ स्वतःच्या खूप आहे, फक्त द़ृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. इतरांचं पाहण्यात आपलं जवळचं आयुष्य, महत्त्वाचा वेळ, आनंदाचे क्षण सर्वच जगायचे राहून जताहेत, स्वतःला ज्या जोखंडांनी बांधलेलं आहे ना त्यातून मुक्त करून, मोकळा श्वास घ्यायला शिकूयात. समाधानने जगणं शिकायला मिळेल, जो आनंद स्वतःहून गमावला होता, तो आनंद पुन्हा मिळेल,
स्वतःला ओळखायला शिकूयात..
A little something for myself
महिला साथीदारही अटकेत; उपनगर पोलिसांत गुन्हा नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी फायनान्स कंपनीत डेप्युटी मॅनेजर असल्याची…
सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश; देशभरात एकसमान आरोग्य धोरण असावे नवी दिल्ली : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने…
नवी दिल्ली : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना ‘हर घर तिरंगा’…
मंत्रिमंडळाचा निर्णय : शिक्षण, ऊर्जा क्षेत्राला चालना मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…
नवी दिल्ली : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील ‘येवला पैठणी’ला आता…