श्रीवर्धनने विकसित केले एआय रोबोटिक कार मॉडेल
पिंपळगाव (वा.) : योगेश सोनवणे
वाहन चालवताना चालकाला डुलकी लागल्यास होणारे भीषण अपघात टाळण्यासाठी देवळा तालुक्यातील भऊर येथील इयत्ता आठवीत शिकणार्या श्रीवर्धन कैलास पवार या होतकरू बालवैज्ञानिकाने एक अत्याधुनिक स्वयंचलित एआय रोबोटिक कार मॉडेल विकसित केले आहे.
आजकाल वाढत्या रस्ते अपघातांवर शालेयवयातच प्रभावी उपाय शोधत श्रीवर्धनने या मॉडेलमध्ये विशेष सुरक्षा यंत्रणा बसवली आहे. वाहन चालवताना चालकाचे डोळे सलग तीन सेकंद बंद राहिल्यास ही यंत्रणा तातडीने सक्रिय होते. चालकाला सावध करण्यासाठी बझर वाजतो आणि काही क्षणातच चालकाच्या घरच्यांना, जवळच्या हॉस्पिटल व पोलिस स्टेशनला आपोआप आपत्कालीन संदेश आणि गाडीचे लाइव्ह लोकेशन पोहोचते. विशेष म्हणजे, त्यानंतर हे रोबोटिक मॉडेल स्वतःहून रस्त्याच्या कडेला जाऊन सुरक्षितपणे थांबते. त्यामुळे मोठा अनर्थ टळू शकतो.
श्रीवर्धन हा कळवण येथील आर. के. एम. विद्यालयात आठवीत शिकत आहे. शिक्षणासोबतच तो शेतीच्या कामातही वडिलांना मदत करतो. ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव आणि शेतीतील यंत्रांच्या ज्ञानाचा वापर करत त्याने हे मॉडेल उभे केले आहे.
बाहेरील कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वतःच्या गल्ल्यातील पैशातून आणि सहज उपलब्ध साहित्यातून त्याने हा प्रयोग यशस्वी केला. यात मित्र जयेश खैरनारचीही त्याला मदत लाभली.
उल्लेखनीय प्रयोगाचे कौतुक
अपघात टाळण्यासाठी काहीतरी करावे, या विचारातून हे मॉडेल तयार केले, असे श्रीवर्धन सांगतो. लहानपणापासूनच त्याला यंत्रांचे विशेष कुतूहल होते, असे त्याचे वडील कैलास पवार यांनी सांगितले. त्याच्या या उल्लेखनीय प्रयोगाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
A remarkable feat by a child scientist from Bhaur
जनरेशन झेड (Gen Z) च्या मानसिक आरोग्याची आव्हाने आणि उपाय हातात अत्याधुनिक स्मार्टफोन, डोळ्यांवर चकाकणारा…
दीपावलीतील पाहिला सण ’वसूबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची…
भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या…
हेमांगी पाटील : दै. गांवकरी नवरंगोत्सवाच्या विजेत्या महिलांचा गौरव नाशिक : प्रतिनिधी स्त्रीचे खरे सौंदर्य…
नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी…
मुख्य बाजारपेठांसह उपनगरांत वाहतूक कोंडीचा विळखा नाशिक : प्रतिनिधी प्रकाशपर्व अर्थात, दिवाळी सणाला आजपासून (दि.…