नाशिक

एक अब्ज भारतीयांना सामाजिक सुरक्षेचे कवच!

भारताच्या ऐतिहासिक भरारीवर आयएलओची आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची मोहर

मुंबई : प्रतिनिधी
भारताने सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि जागतिक पातळीवर दखल घेण्याजोगा टप्पा गाठला आहे. देशातील तब्बल एक अब्ज नागरिक आता सामाजिक सुरक्षेच्या छत्राखाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) भारताच्या या उत्तुंग कामगिरीवर कौतुकाची मोहर उमटवली आहे.
हैदराबाद येथे पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत आयएलओचे महासंचालक गिल्बर्ट एफ. हाँगबो यांनी भारताचे विशेष कौतुक केले. भारताची ही झेप इतर देशांसाठी एक मोठा धडा असून, इतर देशही या यशस्वी मॉडेलचा आदर्श घेऊ शकतात, असे त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात आवर्जून नमूद केले.
ही विक्रमी वाढ एका रात्रीत झालेली नाही, तर त्यामागे गेल्या एका दशकातील सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. केंद्रीय कामगारमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’सबका साथ, सबका विकास’ या दूरदृष्टीला दिले. आकडेवारीनुसार, 2015 मध्ये भारतातील केवळ 25 कोटी (19 टक्के) नागरिक सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत होते. मात्र, अवघ्या अकरा वर्षांत म्हणजेच 2026 पर्यंत हा आकडा एक अब्जाहून अधिक (68.4 टक्के) लोकांपर्यंत पोहोचला आहे. तळागाळातील आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना थेट सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणार्‍या प्रभावी धोरणांमुळेच हा अभूतपूर्व विस्तार शक्य झाल्याचे मांडविया यांनी या बैठकीत स्पष्ट केले. या यशाचा पाया भारताने अलीकडच्या काळात राबवलेल्या आधुनिक कामगार सुधारणा आणि डिजिटल क्रांतीमध्ये दडलेला आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये भारताने तब्बल 29 जुने कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी चार नवीन, सुटसुटीत ’लेबर कोड’ लागू केले, ज्यामुळे कामगारांसाठी एक भक्कम आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण झाली. आजघडीला ’ई-श्रम’ पोर्टलवर 31.7 कोटींहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी झाली असून, त्यांना एक युनिक ओळख मिळाली आहे.

A social security shield for one billion Indians!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

14 seconds ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

5 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

9 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

12 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

19 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

33 minutes ago