मनपाच्या बांधकाम विभागाची अडचण
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीत पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यास नदीचे प्रदूषण वाढते. त्यामुळे महापालिकेने पर्यावरणपूरक तसेच पाण्याचे स्रोत प्रदूषित होणार नाहीत, यासाठी मनपा खबरदारी घेऊन सुमारे दोन लाखांहून अधिक गणेशमूर्तींची विल्हेवाट मलनिस्सारण केंद्र परिसरात खड्डे खोदून करत असते. यंदा मात्र प्रशासनासमोर नवेच संकट उभे राहिले असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मलनिस्सारण केंद्र व परिसरात कामे सुरू असल्याने गणेशमूर्तींच्या विल्हेवाट लावायची कुठे? या समस्येत बांधकाम विभाग सापडला आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी महापालिका जवळपास सव्वादोन लाख गणेशमूर्तींचे संकलन करून त्यांची विल्हेवाट विधिवत मार्गाने करत असते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मलनिस्सारण केंद्रांच्या परिसरात गणेशमूर्तींची विधिवत विल्हेवाट विसर्जन करू नये, असे पत्र मलनिस्सारण व यांत्रिकी विभागाने बांधकाम विभागाला दिले आहे. मलनिस्सारण केंद्रांच्या परिसरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणू नयेत, याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. तसेच संकलित गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र नियोजन करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांना केल्या आहेत. विद्यमान स्थितीत मलनिस्सारण केंद्रांमध्ये नवीन मलनिस्सारण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पाच्या मशिनरी युनिटसाठी जागा तसेच प्रकल्प उभारणार्या एजन्सीने जागोजागी गाडून ठेवलेले साहित्य आणि कामगारांसाठी उभारलेले शेड यामुळे उपलब्ध जागेवर मोठा ताण आहे. सध्या कार्यरत असलेल्या जुन्या मलनिस्सारण केंद्रांच्या पाइपलाइन व मशिनरीच्या केबल्स भूमिगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन केल्यास सुरू असलेल्या मलनिस्सारण केंद्राच्या कामात तसेच नवीन प्रकल्पांच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या गणेशमूर्ती विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची, असा पेच बांधकाम विभागासमोर निर्माण
झाला आहे.
नैसर्गिक, कृत्रिम तलावात विसर्जन
मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून गणेशमूर्तींचे संकलन करण्यासाठी नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांची निर्मिती करून मूर्ती संकलन केले जाते. या सव्वादोन ते अडीच लाख मूर्ती संकलित केल्यानंतर त्यांचे विधिवतपणे जुन्या विहिरीत किंवा नदीकाठावरील मलनिस्सारण केंद्रांच्या परिसरात खड्डा खोदून पुरविल्या जातात. यंदा मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मलनिस्सारण केंद्राच्या अपग्रेडेशनची कामे सुरू असल्याने गणेशमूर्ती विल्हेवाटीचा प्रश्न उभा राहिला आहे.
How should two lakh idols be disposed of?
लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…
कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…
सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…
अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…
महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…