अभियंत्यांकडून पाचशेची लाच घेताना महिला शिपाई अडकली जाळ्यात

महावितरणच्या महिला शिपायाला
पाचशेची लाच घेताना अटक
नाशिक : प्रतिनिधी
विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना विद्युत निरीक्षक कार्यालयातील महिला कर्मचारी गीता हेमंत बोकडे , रा. फ्लॅट क्रमांक22, गणेश वास्तु अपार्टमेंट, अशोका मार्ग नाशिक यांना काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार या विद्युत अभियंता असून त्यांना विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालय उद्योग ऊर्जा कामगार विभाग नाशिक येथे अर्ज  करावयाचा असल्याने परवान्याकरिता लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करून परवाना मिळून देईल, असे सांगून तक्रारदार यांच्याकडे 1500/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील 1000/-रुपये यापूर्वी स्वीकारले असून काल  उर्वरित 500 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक  श्रीमती गायत्री मधुकर जाधव,
पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल यांच्या पथकाने अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा     घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक  नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Bhagwat Udavant

Recent Posts

फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करूया!

आपण वर्षभर विविध सण साजरे करतो. त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाला…

5 hours ago

भाकरी फिरवली

भाकरी फिरवली नाही तर ती करपते. राजकारणात भाकरी फिरवण्याला फारच महत्त्व असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक…

5 hours ago

दीपोत्सवानिमित्त पूरग्रस्तांना किराणाधान्य किट वाटप

येवल्याच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे दातृत्व येवला : प्रतिनिधी दीपावली तोंडावर आली असताना, दुसरीकडे…

5 hours ago

सिन्नरच्या व्यापार्‍याची फसवणूक करणारा सायबर भामटा अटकेत

सिन्नर : प्रतिनिधी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापार्‍याची तब्बल 64 लाखांची फसवणूक करणार्‍या…

5 hours ago

इंदोरहून एक हजार केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध

शनिवारपासून पाणीयोजनेचा किमान एक पंप सुरू होण्याची अपेक्षा सिन्नर : प्रतिनिधी कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी बनवण्यात…

5 hours ago

सिन्नरकरांवर ऐन दिवाळीत पाणीटंचाईचे संकट

भाजपाचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासाठी राज्याचे क्रीडा व…

5 hours ago