नाशिक

…अन् आ. आहिरे भात आवणीत तल्लीन

राजकीय आखाड्यातून थेट बांधावर

नाशिक : प्रतिनिधी
राजकीय आखाडा गाजवणार्‍या देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे या शेतात भात आवणीत तल्लीन झाल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांच्या शेतीच्या कामाशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे आणि शेतीतील प्रत्यक्ष कष्टांचा अनुभव घेता यावा, यासाठी वाडगाव येथील शेतकरी धोंडिराम निवृत्ती निंबेकर यांच्या शेतात भात आवणीच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. आहिरे यांनी शेतकर्‍यांसोबत शेतात उतरून भाताची लागवड केली.
वरुणराजाने जुलै व ऑगस्टमध्ये जोरदार हजेरी लावल्याने नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान, पावसाळ्याच्या या अनुकूल वातावरणात भात लागवडीची कामे सुरू आहेत. या उपक्रमातून शेतकर्‍यांच्या कष्टाशी प्रत्यक्ष जोडले जाण्याचा अनुभव मिळाला. यावेळी महिला शेतकरी तसेच शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी सरपंच, तालुका कृषी अधिकारी नाशिक जगदीश तुंबारे, सहाय्यक कृषी अधिकारी वाडगाव सविता खाडे आणि समूह सहाय्यक गिरणारे सविता मोते उपस्थित होते. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेतीविषयक समस्या, अडचणी आणि गरजा समजून घेण्याबरोबरच कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकर्‍यांच्या कष्टाला प्रत्यक्ष अनुभवत भात आवणीत सहभाग घेतल्याने उपस्थितांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आ. आहिरे यांनी भात आवणीत सहभाग घेतल्याने त्यांच्या या कृतीची चांगलीच चर्चा शेतकर्‍यांत झाली.

समस्या मार्गी लावण्यासाठी उपक्रम
शेती ही आपल्यासाठी मातृत्वाच्या जागी असून, शेतीचे सर्वांसाठी अनन्य असे महत्त्व आहे. भात आवणीच्या उपक्रमाद्वारे मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या काय अडचणी, समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी विभागाचे अधिकारीदेखील उपस्थित असल्याने शेतकर्‍यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावे, याच उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याने याचा शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल.
– आ. सरोज आहिरे, देवळाली मतदारसंघ

 

…and come. Ahire is engrossed in the paddy fields

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

17 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

17 hours ago